Tag Archives: रूग्णालयात दाखल

सलीम खान यांना दाखल केले लीलावती रूग्णालयात आरोग्याबद्दलतची कोणातीही अधिकृत माहिती नाही

अभिनेता सलमान खानचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नसले तरी, दिवसभर कुटुंबातील सदस्य त्यांना भेटण्यासाठी आले होते. सलमान, त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्री आणि मेहुणे अतुल अग्निहोत्री यांच्यासह, रुग्णालयाच्या बाहेर पापाराझींनी त्यांचे …

Read More »

संजय राऊत रूग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाले,हात लिहिता राहिला पाहिजे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने रूग्णालयात दाखल

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने मुंलुंड येथील फोर्टीस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एक्सवर एक पत्र पोस्ट करत प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती. तसेच काही महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे सांगितले. …

Read More »

संगीतकार ए आर रहमान यांना रूग्णालयातून डिस्चार्ज डिहायड्रेशनमुळे अशक्त वाटत होते म्हणून रूग्णालयात दाखल केले होते

प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांना डिहायड्रेशनमुळे अशक्य वाटत होते. त्यामुळे आज सकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ए आर रहमान यांच्या मुलाने ट्विटरवरून दिली. ए.आर. रहमान यांच्या मुलाने संगीतकारांच्या आरोग्याविषयी माहिती दिली: वडील डिहायड्रेशनमुळे अशक्त वाटत होते ए.आर. रहमान यांचा मुलगा …

Read More »

धनंजय मुंडे यांची माहिती, मला बेल पल्सी आजाराचे निदान वाढत्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी दिली माहिती

मागील काही महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या कथित संबधावरून आणि कृषी खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच सुरेश धस आणि धनंजय …

Read More »

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला त्याच्याच एका क्रिकेट फॅनने केले रूग्णालयात दाखल ठाण्यातील आकृती हॉस्पीटलमध्ये विनोद कांबळीला केले अॅडमिट

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली होती. विनोद कांबळी याने त्याच्या व्याह्यात गोष्टी सोडून द्याव्यात असा सल्ला त्याचा मित्र सचिन तेंडूलकर आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांनी विनोद कांबळी यास जाहिरपणे दिला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत विनोद कांबळी याने पुर्नवसन केंद्रात दाखल होण्याची तयारीही दाखविली. त्यास …

Read More »

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर रूग्णालयात दाखल अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात येणार, प्रकृती स्थिर

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकर …

Read More »