Breaking News

Tag Archives: विद्यार्थी

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारमुळे पालक-विद्यार्थी देशोधडीला लागणार कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा महायुतीचा निर्णय

राज्यातील खाजगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने तात्काळ स्थगित करावा. कारण महायुती सरकारने असंविधानिकपणे, कायद्याची पायमल्ली करुन आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन हा निर्णय घेतला आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आर्थिक …

Read More »

नारायण मुर्ती म्हणाले, कोचिंग क्लास यशस्वी होण्याचे प्रभावी माध्यम नाही पॉल हेविट यांच्या पुस्तकाच्या १३ व्या आवृत्ती प्रकाशप्रसंगी व्यक्त केले मत

कोचिंग क्लास हे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रभावी माध्यम नाही, असे इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी सांगत देशभरात चालवल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेस पद्धतीवर थेट टीका करत जे विद्यार्थी त्यांच्या नियमित शालेय वर्गात सहभागी होऊ शकत नाहीत ते बहुतेकदा या बाह्य वर्गांवर अवलंबून असतात अशी मल्लिनाथीही यावेळी जोडली. बेंगळुरू येथे …

Read More »

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत समानता आणण्यासाठी उच्चधिकार समिती राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना दिली जाते शिष्यवृत्ती

विविध शासकीय संस्थामार्फत सामाजिक घटकांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी आता सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चाधिकारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यासंदर्भात सामाजिक न्याय व …

Read More »

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा ६ सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी दि. ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे. अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०२४-२५ मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर …

Read More »

अमेरिकेने व्हिसासाठीच्या प्रक्रियेत केले हे बदल फि वाढीसह अनेक गोष्टीच्या नियम बदलले

अमेरिकेने अलीकडेच आपल्या व्हिसा अर्ज प्रक्रिया आणि कार्य अधिकृतता नियमांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा आणल्या आहेत, जे १ एप्रिल २०२४ पासून लागू झाले आहेत. सुरक्षा वाढवण्याच्या प्राथमिक उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. विदेशी नागरिकांसाठी अमेरिका हे नेहमीच आकर्षक ठिकाण राहिले आहे. जगभरातील अनेकांना यूएसमध्ये जाण्याची आणि करिअरची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी …

Read More »

विद्यार्थ्यांच्या शालेय वस्तू पुरवठा कंत्राटात ३३० कोटींचा घोटाळा घोटाळ्याची चौकशी करा अन्यथा आंदोलन - मुंबई काँग्रेसचा इशारा !

महापालिका शाळांतील लाखों विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय वस्तूंच्या पुरवठ्यात मोठा घोटाळा झाला आहे. साधारण ३३० कोटी रूपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोप माजी उपमहापौर अश्रफ आझमी, माजी नगरसेवक मोहसिन हैदर, सुफियॉं वणू यांनी केला आहे. अद्यापही मुलांना शालेय साहित्य मिळालेलं नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही मुंबई काँग्रेसमधील पत्रकार परिषदेत …

Read More »

न्युझीलंडमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्यांना बायको-मुलांनाही सोबत नेता येणार ग्रीन लिस्टमध्ये असलेल्यांसाठी इमिग्रेशनचे नियम बदलले

न्यूझीलंडने त्यांच्या देशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जोडीदारांसाठी कामाचे अधिकार आणि नियम बदलले आहेत. व्हिसा असलेल्या विद्यार्थ्यांच्या जोडीदारासाठी कामाच्या पात्रतेसाठी अद्ययावत निकष जारी करण्यासाठी इमिग्रेशनवरील सूचना सुधारित केल्या आहेत. एखाद्या व्यक्तीचा जोडीदार ग्रीन लिस्टमध्ये दिसणारी लेव्हल ७ किंवा ८ पात्रता यासारखी उच्च शिक्षणाची पदवी घेत असल्यास ती वर्क व्हिसासाठी पात्र …

Read More »

NEET परिक्षेच्या विद्यार्थ्यांचे महिना अखेरीपासून समुपदेशन सुरू होण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये एनएटीकडून सुरुवात

संपूर्ण देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (NEET-UG) २०२४ च्या परिक्षेत पेपर फुटी झाल्याची घटना घडली. तसेच या पेपर फुटीप्रकरणामुळे जवळपास १५०० हून अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या पार्श्वभूमीवर एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी मंडळाकडून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची ग्वाही दिली. …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीची दुसऱ्या दिवशी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा- २०२३ लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता १ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलै २०२४ ते ३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकऱ्यांची लूट आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त… ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांनाही विश्वास नाही पण भाजपा सरकार व निवडणूक आयोगाची अडेलतट्टूची भूमिका

केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणा-या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने आज राज्यभरात …

Read More »