Tag Archives: विद्यार्थी

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, स्कूल बस नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार स्कूल बसबाबतची नवी नियमावली महिन्याभरात लागू करणार

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.  स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा  केल्या जातील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन …

Read More »

पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना यूकेमध्ये शिक्षण काम करण्यास बंदी पाकिस्तानसह या तीन देशांना व्हिसा न देण्याचा निर्णय

पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांना आणि कामगारांना यूकेमध्ये शिक्षण घेण्यास आणि काम करण्यास बंदी घालण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे, नायजेरियन आणि पाकिस्तानी नागरिकांसह, जे जास्त काळ राहण्याची आणि आश्रय घेण्याची शक्यता जास्त आहे, त्यांच्या रोजगार आणि अभ्यास व्हिसासाठी अर्ज गृह कार्यालयाद्वारे प्रतिबंधित केले जातील, असे द टाईम्सने वृत्त दिले आहे. २०२४ मध्ये पाकिस्तान (१०,५४२), …

Read More »

सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वी परिक्षेचा निकाल कधी लागणार २ मे रोजी लागणार असल्याची माहिती खोटी सीबीएसई बोर्डाची माहिती

२०२५ च्या सीबीएसई बोर्डाच्या निकालांची वेळ जवळ येत असताना, सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा वर्षाव होत आहे. बनावट पत्रे आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणा प्लॅटफॉर्मवर पसरत आहेत, ज्यामुळे ४२ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. २ मे २०२५ रोजी लिहिलेल्या अशाच एका पत्रात सीबीएसई दहावीचे निकाल ६ मे …

Read More »

१२ वी परिक्षेचा निकाल या दिवशी जाहिरः या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार परिक्षा मंडळाकडून १२ वी परिक्षेच्या निकालाची तारीख जाहिर

१२ वीची परिक्षा फेब्रुवारी महिन्यात झाली. त्यानंतर १२ वी परिक्षेचा निकाल मे महिन्याच्या अखेरला जाहिर होणार की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिर होणार याबाबत उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. मात्र पुणे मंडळाकडून १२ वी परिक्षेच्या निकालाची तारिख आजच जाहिर केली असून परिक्षेचा निकाल सोमवारी ५ मार्च रोजी जाहिर करण्यात येणार …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णयः विद्यार्थ्यांचा ५०० रुपयांचा भुर्दंड वाचला ५०० रुपयांची स्टॅम्प ड्यूटी रद्द- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

राज्यातील १० वी, १२वी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविधप्रकारच्या कागदपत्रांसाठी भरून द्यावे लागणाऱ्या ५०० रूपयांचे मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून द्यावे लागत होते. मात्र आता यापुढे राज्यातील विद्यार्थ्यांना कोणत्याही लागणाऱ्या कागदपत्रांसाठी ५०० रूपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून देण्याची गरज राहणार नाही. केवळ स्वःहस्ताक्षरात साध्या कागदावर …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची माहिती, ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी राज्य सीईटी सेलच्या ‘सीईटी-अटल’ विशेष उपक्रमात १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळ्खण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात  येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  परीक्षांचा  सराव करता  यावा यासाठी   ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमात आतापर्यंत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांत …

Read More »

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’ आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम

आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक महत्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यभरातील शासकीय …

Read More »

विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजनेसंदर्भात” विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घ्यावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी “कॅरी ऑन योजना” लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठांच्या पातळीवर एक समानता ठेवावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन माध्यमातून …

Read More »

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन याबरोबरच टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

राज्यातील उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, प्रभावी याबरोबरच सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, जाहिरात डिझाईन आणि टॅगलाईन अशा तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने …

Read More »

विद्यार्थ्यांना आहारात अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व देण्याचाही शाळांना पर्याय शालेय शिक्षण विभागाची माहिती

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने योजनेंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरविण्यासाठी शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास अंडा पुलाव व गोड खिचडी, नाचणी …

Read More »