Tag Archives: शरद पवार

फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार यांचा पलटवार, हे ही त्यांच अज्ञानच… मी सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा फडणवीस शाळेत असतील

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांवर टोलेबाजी चालू असताना दुसरीकडे फडणवीसांनी शरद पवारांविषयी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्र सोडलं. यावेळी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची बैठकीनंतर स्पष्टोक्ती, मतभेद असतील पण आम्ही…

भाजपाच्या मनमानी आणि हुकूमशाही पध्दतीच्या कारभाराच्या विरोधाच जवळपास २० हून अधिक राजकिय पक्ष एकत्र येत आज बिहारच्या पाटण्यात आयोजित बैठकीसाठी आले होते. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून निवडणुका एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व नेत्यांनी आपली …

Read More »

विरोधकांच्या संयुक्त बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा

भाजपाविरोधी ऐक्य दर्शवण्याकरता संयुक्त विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या बैठकीत देशभरातील २० हून जास्त विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहिले होते. ही बैठक संपल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसंच, पुढची बैठक शिमल्यात होणार असल्याचंही त्यांनी …

Read More »

अजित पवार यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील दाव्यानंतर छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाभरणी करताना शरद पवारांनी काँग्रेसमधील अनेक मातब्बर मराठा नेत्यांना साथीला घेतलं. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील अशा मुरब्बी नेत्यांसोबतच तरूण नेत्यांचीही पवारांना साथ लाभली. जयंत पाटील आर.आर.पाटील, दिलीप वळसे पाटील ते राजेश टोपे शरद पवारांनी यांसारख्या उमद्या मराठा नेत्यांना ताकद दिली.. पवारांनी घडवलेल्या मराठी नेत्यांची यादी तशी …

Read More »

शरद पवार यांचा टोला, …कुठे जायचे तेथे जावे पण अंतर्गत स्थितीचा बंदोबस्त करावा

मणिपूर येथे मागील ४५ दिवस सतत दंगली होत आहेत. केंद्र सरकार ज्याप्रमाणे मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांना पाहत आहे त्यातून तिथल्या लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्याने आम्ही या देशाचे नागरिक आहोत का? असा प्रश्न पत्राद्वारे केला. लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना असे वाटत असेल तर सामान्य माणसाची अवस्था काय असेल? देशाच्या पंतप्रधानांनी कुठे जायचे तिथे जावे, …

Read More »

शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवार यांची मागणी, मला मुक्त करा…

गेल्या महिन्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याच जाहीर केलं. त्यानंतर कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्याचवेळी पक्षातील नेत्यांकडे अधिक आणि मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील असं त्यांनी जाहीर केलं. त्यानुसार गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल …

Read More »

जाहिरात वादावर शरद पवार यांची खोचक प्रतिक्रिया, आमच्या ज्ञानात भर पडली…

शिंदे गटाकडून ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात देऊन एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर भाजपा-शिंदे गटाच्या कार्यकर्ते-नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आता या जाहिरात वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी १६ जून रोजी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, …

Read More »

फडणवीसांच्या टीकेवर अजित पवार यांची स्पष्टोक्ती, …फारसे महत्व देण्याची गरज नाही याला भाकरी फिरवणे म्हणत नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे, याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. ही निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीने काय करावं, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी …

Read More »

घराणेशाहीचा आरोपावर सुप्रिया सुळे यांचा पलटवार,…सोयी प्रमाणे दिसते…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे आणि विश्वासू सहकारी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. मात्र या दोघांकडे जबाबदारी सोपविताना कोणत्याही राजकिय पक्षात महत्वाच्या मानण्यात येत असलेल्या पक्षांतर्गत निवडणूक समितीच्या प्रमुख पदाची सुत्रेही सुप्रिया …

Read More »

उदय सामंत यांचा दावा, वज्रमुठ फक्त दाखविण्यासाठीच… अजित पवार यांच्या नाराजी नाट्यावर सामंत यांचे वक्तव्य

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध …

Read More »