राज्यातील हिंदी सक्तीवरून मुंबईसह राज्यातील तमाम मराठी जनांनी एकत्र येत राज्य सरकारच्या विरोधात लढा पुकारला. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीचा मुद्यापासून माघार घेत असल्याचे राज्य सरकारने जाहिर केले. त्यानंतर हिंदी भाषेच्या अनुषंगाने नव्याने एका समितीची स्थापना राज्य सरकारने केली. मात्र मराठी जणांच्या …
Read More »दिशा सालीयन मृत्यूप्रकरणी पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती, तिची आत्महत्याच उच्च न्यायालयाचा आदित्य ठाकरे यांना दिलासा, पुढील सुनावणी १६ जुलै रोजी
माजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सॅलियनचा मृत्यू आत्महत्याने झाला आणि तिच्या मृत्यूमध्ये कोणताही गुन्हा आढळला नाही, असे मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे, जरी तिचे वडील सतीश सॅलियन यांनी पुन्हा सांगितले की, तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. दिशा सॅलियनने स्वतःच्या इच्छेने फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारली होती …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी, तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करा ४ वर्षे होत आली तरी पुर्नवसन नाही
महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४ वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे दरडग्रस्त कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यात आले नाही, ही बाब विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. तसेच या पावसाळ्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी लवकरात लवकर या कुटुंबियांचे पुर्नवसन करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी …
Read More »संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसाकडे केली आमदार सुनिल शेळके यांची तक्रार रॉयल्टी बुडवल्याचा केला आरोप, पत्र पाठवत केली मोठा आरोप
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र पाठवित अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात तक्रार केली. या पत्रात संजय राऊत यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात गंभीर आरोप करत शेळके यांच्याकडून महाराष्ट्राची होणारी लुटमार थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे …
Read More »उद्धव ठाकरे यांचा महायुती सरकारला पुन्हा इशारा, शिक्षणाचा विषय आहे अशी थट्टा करू नका याप्रश्नी आता अर्थतज्ञांच्या अध्यक्षतेखाली नविन समिती
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ कामकाजात सहभाग नोंदविला. पहिल्या दिवसाचे कामकाजा पहिल्या तास भरातच संपल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, राज्य …
Read More »उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसांचा विजय, ५ जूलैला मोर्चा नाहीतर जल्लोष अहो अहवाल स्विकारला पण पान उघडायच्या आधीच सरकार पाडलं
आगामी ५ जूलै रोजी राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पक्षाच्या सहभागात राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर हिंदी भाषेसंदर्भात घेतलेले निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यावर शिवसेना उबाठाचे प्रमुख …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, हिंदी भाषेसंदर्भातील पूर्वीचे दोन्ही जीआर निर्णय रद्द आता त्रिसुत्री भाषेसाठी डॉ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती, समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेणार
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारी चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तरीही राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेच्या अनुषंगाने राज्य सरकारने जारी केलेले शासन निर्णय रद्द करण्यात …
Read More »अंबादास दानवे यांची स्पष्टोक्ती, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, हिंदी भाषेची सक्ती सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर, महाविकास आघाडी सरकारचा बहिष्कार
राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांप्रती सरकारची असंवेदनशीलता, बळीराजाची होत असलेली दयनीय अवस्था, विविध भ्रष्टाचारात मंत्र्यांचा हात, हिंदीची होत असलेली सक्ती यामुळे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज …
Read More »उद्धव, राज ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून भाजपाला भरली धडकी हिंदी भाषेच्या विरोधात दोन्ही ठाकरे एकत्र
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख, आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. मराठी माणूस, मराठी भाषा यासाठी लढणारे ठाकरे बंधू मैदानात उतरत असताना भाजपाच्या मनात धडकी भरली आहे. आपल्या विरोधात जनमत तयार होऊ नये, म्हणून भाजपाने नवी रणनीती आखण्याची तयारी केली आहे. राज्यात पहिली पासून हिंदीची …
Read More »उद्धव ठाकरे यांचे विरोधकांना आव्हान, कम ऑन किल मी, पण येताना रूग्णावाहिका आणा प्रहार चित्रपटातल्या नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन प्रमाणे माझे विरोधकांना आव्हान
मी काही वर्षापूर्वी प्रहार चित्रपट पाहिला होता. तो चित्रपट कोणाचा होता ते माहित आहे का, तो चित्रपट अभिनेता नाना पाटेकर याचा होता. त्या चित्रपटात नाना पाटेकर जेव्हा तो गुंडासमोर उभा राहतो त्यावेळी तो म्हणतो की, कम ऑन किल मी त्याप्रमाणे मी आज विरोधकांना मी म्हणतो की, कम ऑन किल मी. …
Read More »
Marathi e-Batmya