मागील महिन्यात पहलगाम येथील बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना विविध पद्धतीने इशारे देत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानंतर ७ मेला भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित ९ दहशतवादी तळांवर हल्ले करत दहशतवादी तळ उद्धवस्त केले. तसेच देशातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक सरकारने दोन वेळा बोलावली. मात्र या बैठकीला स्वतः पंतप्रधान मोदी गैरहजर राहिले. मात्र अमेरिकेच्या सांगण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईत भारतीय लष्कराची स्थिती चांगली असतानाही पाकिस्तानबरोबर दोनच दिवसात शस्त्रसंधी केली. त्यावरून सध्या संपूर्ण देशभरातच टीका होत आहे. या सगळ्या घडामोडीनंतर काही वेळातनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेला ऑनलाईनरित्या संबोधित करणार आहेत. त्यावरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवित खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी एक्सवर एक फोटो शेअर केला असून तो फोटो ८ पीएम नावाने ओळखल्या जाणाऱ्या मद्याचा आहे. तसेच त्याचसोबत त्याच कंपनीचा कॅनही आहे. तर त्या शेअर केलेल्या फोटोला एक कॅप्शनही दिला आहे. तो कॅप्शन म्हणजे आज इतकेच लिहिले आहे.
विशेष म्हणजे आजच रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी शेअर केलेला फोटो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन याचा योगायोगाने अप्रत्यक्ष संबध जोडत पंतप्रधान मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत एकप्रकारे त्यांची खिल्लीही उडविली आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 12, 2025
Marathi e-Batmya