Tag Archives: ajit pawar

राज्य सरकारच्या आवाहनाला भाजपाचा प्रतिसाद भाजपातर्फे सेवाकार्य अभियानातंर्गत १ लाख २५ हजार कार्यकर्त्ये कामाला

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोना आजार संकटाच्या मुकाबल्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांनी एकजूट दाखवित एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. या आवाहनाला प्रदेश भाजपाने सकारात्मक प्रतिसाद असून राज्यातील गरजू लोकांना जेवण, त्यांना दैनंदिन वस्तुंचा पुरवठा, रक्तदान शिबीरे आदी गोष्टींसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला …

Read More »

मुख्यमंत्र्यांसह आमदार ते सरपंचापर्यंतच्या सर्वांना फक्त ४० टक्के वेतन तर सरकारी कर्मचाऱ्यांचे २५ ते ५० टक्के वेतन कपात करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ लॉकडाऊनची लक्षणे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दिसण्यास सुरुवात झाली असून याचा परिणाम म्हणून मुंख्यमंत्र्यांसह, आमदार, मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्यापासून ते सरपंचापर्यंत मिळणाऱ्या वेतनात ६० टक्के तर राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. …

Read More »

पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची …

Read More »

राज्याचे मुख्य सचिव मेहतांना तीन महिन्यांची मुदतवाढ मुदतवाढीस केंद्राची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटाने सगळ्यांना ग्रासलेले असल्याने आहे. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे प्रशासन काम करत आहे. या आपातकालीन परिस्थितीमुळे त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याने आता मेहता हे ३० जून २०२० रोजी निवृत्त होतील. मुख्य सचिव …

Read More »

आणि राज्याचा कामगार विभाग जागा झाला बांधकाम कामगार, असंघटीत कामगारांची संख्या विभागालाच माहित नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील संघटीत क्षेत्राबरोबरच असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी राज्यात कामगार विभागाची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या कित्येक वर्षात राज्यातील असंघटीत क्षेत्रात किती कामगार काम करत आहेत, बांधकाम कामगार किती आहेत याची साधी माहिती गोळा करण्याचे काम अद्याप या विभागाने केलेले नसल्याची धक्कादायक माहिती …

Read More »

अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळविक्री करण्यास उपमुख्यमंत्री पवार यांची परवानगी

मुंबई : प्रतिनिधी जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली.. लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या …

Read More »

फक्त मालवाहू ट्रक चालणार खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी  देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून न अडविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री …

Read More »

जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी पालिका, स्वंयसेवी संस्थानी पुढे यावे डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तसेच याकाळात अत्यावश्यक धान्य, औषधे, गँस यासह दैनदिंन जीवनात लागणाऱ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. तरीही नागरीकांकडून रस्त्यांवर गर्दी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला, धान्य, औषधे नागरीकांना घरपोच देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका, नगरपालिकांनी …

Read More »

गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, किराणा, औषधांच्या गाड्या सोडाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एमएमआरमधील नागरीकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली. तसेच शहरातील रस्त्यांवर गर्दी होवू नये यासाठी प्रत्येक सोसायटीत राहणाऱ्या नागरीकांच्या भाजीपाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. या भाजीपाल्याबरोबरच जर राज्य सरकारने प्रत्येक सोसायटीत, झोपडपट्टीभागात किराणा माल आणि …

Read More »