Tag Archives: ajit pawar

बाबा आढावांच्या शेजारी बसून अजित पवार म्हणाले, आम्हाला ढवळाढवळ… निवडणूक आयोग स्वायत्त संस्था

लोकसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीला चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र शंका उपस्थित व्हाव्यात इतक्या कमी जागांवर विजय मिळाला. त्यातच सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपा महायुतीला मिळालेल्या जागांवरून तर्क वितर्क लढवित निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि भाजपाच्या विजयावर संशय व्यक्त करण्यात येऊ लागला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये डॉ …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला दिलेला निधी देवेंद्र फडणवीसांकडून अखेर रद्द राज्य मंत्रिमंडळात मंजूर केलेला निधी चुकीचा म्हणून अखेर रद्द

राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने विविध समाजघटकांना खुष करण्याचा सपाटाचा लावला होता. त्यावेळी शेवटच्या दिवसात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला १० कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच वक्फ बोर्डाशी संबधित एका …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, राज्यातील महायुतीचा सत्ता फॉर्म्युला ठरला… दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री असाच फॉर्म्युला

राज्यातील विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत मिळवलेल्या महायुतीतील सत्ता स्थापनेच्या अंतर्गत घडामोडीवरील वाद अद्याप संपलेला दिसत नाही. त्यातच निवडणूकीचे संशयातीत निकाल लागून चार-पाच दिवस झाले तरी राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार, मुख्यमंत्री कोण होणार महायुतीतील घटक पक्षांना कोणती खाते देणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसह राजकिय वर्तुळात …

Read More »

आता हाच ट्रेंड, अजित पवार यांची साथ सोडणारे पुन्हा निवडून आले नाहीत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग...

कोट्यावधी रुपयांचा निधी आणि विकासकामांना मंजुरी घेऊन ऐन निवडणुकीत अजित पवार यांची साथ सोडणाऱ्या आमदारांना व माजी आमदारांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याचे चित्र महाराष्ट्रात पहायला मिळाले. त्यामुळे अजित पवार यांची साथ सोडणारे पुन्हा निवडूण आले नाहीत हाच ट्रेंड पहायला मिळत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांकडून करण्यात येत …

Read More »

एकनाथ शिंदे बनले काळजीवाहू मुख्यमंत्री, संशयातीत बहुमतानंतरही अद्याप चर्चाच नियमानुसार विद्यमान राज्य मंत्रिमडळाने दिला राजीनामा

विद्यमान विधानसभेची मुदत संपत आली आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीशी संबधित प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यानुसार आज मंत्रिमंडळाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल सीपी राधाकृष्णन …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, आणि त्यानंतर माझी झोपचं गेली… शरद पवार यांनी दिलं होतं बारामतीचं प्रतिनिधीत्व

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बारामती विधानसभा मतदारसंघात काका-पुतण्यामधील लढाईचा दुसरा अंक सुरु आहे. या निवडणूकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार हा अंक राज्याच्या राजकारणातील पाहिल्यानंतर अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यांच्यातील नवा काका-पुतण्याचा अंक पाह्यला मिळत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाचा एकप्रकारे कस लागणार आहे. …

Read More »

बारामतीतील शेवटच्या सभेत शरद पवार म्हणाले, अजित पवारला तिनदा उपमुख्यमंत्री, आता युगेंद्र युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी घेतली लेंढीवाढी पट्यात शेवटची सभा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आज पार पडल्या. आज झालेल्या सभेमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार काय बोलणार याकडे तमाम बारामतीवासियांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच काका-पुतण्याच्या लढाईत नातू बाजी मारणार का या विषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यातच बारामतीतील …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे अजित पवार यांच्यासह सोडून गेलेल्या आमदारांना दिला इशारा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने सुपर संडे, उद्या संध्याकाळी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होईल आणि ४८ तासानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस अर्थात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीतील काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात कोण कोणावर मात करणार याचा फैसलाही या निवडणूकीच्या निमित्ताने बारामतीत होणार आहे. …

Read More »

नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताः दोन आठवड्यानंतर सुनावणी नियमित जामीन अर्जावर उच्च न्यायालयात दोन आठवड्यांनी सुनावणी

माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते नवाब मलिक सध्या अंतरिम वैद्यकीय जामीनावर बाहेर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याने ते सध्या कोणत्याही आडकाठीविना प्रचारात व्यग्र असल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने गुरूवारी दखल घेतली. मलिक यांनी नियमित जामीनासाठी काही महिन्यांपूर्वी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आणि गुणवत्तेच्या आधारे त्यावर निर्णय देण्याचे …

Read More »

अजित पवार यांचा दावा, त्या सरकारसाठी अदानी, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक औट घटकेच्या सरकारचा शपथविधी शरद पवार यांच्या सांगण्यावरून

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होण्यापूर्वी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होण्यासाठी गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तसेच शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच त्यावेळी सरकार स्थापन करण्यात आले. तसेच यासंदर्भात गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. तसेच त्या बैठकीला अमित शाह …

Read More »