डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा केली: २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती दर्शवली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “पाकिस्तानच्या डीजीएमओंनी दुपारी ३.३५ वाजता डीजीएमओला फोन केला. त्यांनी संध्याकाळी ५ …
Read More »मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर म्हणाले, ही गोष्टी चांगली नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर बोलताना केली टीका
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या व्यापक दरांच्या वजनाखाली यूएस मार्केट डळमळत असताना, मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर शब्द कमी करत नाहीत. मायक्रोसॉफ्टच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या समारंभात बोलताना, बाल्मरने चेतावणी दिली की ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांनाही १०० हून अधिक देशांमधून आयातीवर व्यापार निर्बंधांचा त्रास जाणवेल. “मायक्रोसॉफ्टचे शेअरहोल्डर म्हणून, या प्रकारची गोष्ट चांगली …
Read More »व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर वोलोदिमीर झेलेन्स्की यांची ती पोस्ट अमेरिकेचे मानले आभार, अमेरिकेचा पाठिंबा महत्वपूर्ण आतापर्यंतच्या पाठिंब्याबद्दल आभार
व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या त्यांच्या तणावपूर्ण भेटीदरम्यान त्यांनी घेतलेल्या लढाऊ स्वराच्या अगदी उलट, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी सांगितले की रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा महत्त्वाचा होता आणि ते खनिज करारावर स्वाक्षरी करण्यास तयार होते.एक्सवर X वोलोदमीर झेलेन्स्की यांनी रशिया युद्धात अमेरिकेच्या मदतीबद्दल खोलवर कृतज्ञता व्यक्त केली, …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा दौराः अमेरिकन व्हिस्कीवरील सीमा शुल्कात ५० टक्क्याची कपात बर्बन व्हिस्कीच्या १५० टक्के असलेल्या सीमाशुल्कात ५० टक्क्यांची कपात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावणे अपेक्षित असताना त्यांना ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे साधे निमंत्रणही आले नाही. त्यातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर कर आकारणाऱ्या देशावर टेरिफ आकारण्याची घोषणा करत काही देशांवर टेरिफही आकारले. त्या पार्श्वभूमीवर भारतावरही टेरिफ आकरण्याची शक्यता वर्तविण्यात …
Read More »अमेरिकेने बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना परत पाठविले ७९ पुरूष आणि २५ महिलांना घेऊन अमेरिकन विमान दुपारी अमृतसरला पोहोचले
अमेरिकेत बेकायदेशीररित्या स्थलांतरीत झालेल्या १०४ भारतीय नागरिकांना आज अमेरिकेने सी -१७ या खास लष्करी विमानाने भारतात परत पाठविले. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत अनधिकृतरित्या स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मायभूमीत परत पाठविणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अनधिकृतपणे अमेरिकेत स्थलांतरण करणाऱ्या भारतीयांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने कारवाई करत परत पाठविले आहे. बेकादेशीररित्या अमेरिकेत …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये भारत काय कमावणार-गमावणार भारत क्रॉस फायरमध्ये अडकण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प यांचे दुसरे अध्यक्षपद जागतिक व्यापारात मोठे बदल घडवून आणू शकते, ज्यामध्ये भारत कदाचित क्रॉसफायरमध्ये अडकण्याची शक्यता आहे. विशेषतः ब्रिक्स राष्ट्रांविरुद्ध पुन्हा मोठ्या प्रमाणात शुल्क लादल्याने चिंता निर्माण झाली आहे. “जर ब्रिक्स राष्ट्रांनी डॉलरचे मूल्य कमी करणे सुरू ठेवले तर त्यांना १००% शुल्क आकारले जाईल,” ट्रम्प यांनी त्यांच्या उद्घाटन …
Read More »अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्लूएचओतून घेतली माघारः भारतवर परिणाम? डब्लूएचओच्या निधीवर होणार परिणाम आणि धोक्याच्या इशाऱ्यावर होणार परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेतून अर्थात डब्लूएचओ WHO संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. आदेशात म्हटले आहे की माघार घेण्याची कारणे डब्लूएचओ WHO ने कोविड-१९ “COVID-19 साथीच्या आजाराचे चुकीचे व्यवस्थापन” केले आहे, “तातडीच्या आवश्यक सुधारणा स्वीकारण्यात अपयश”, “डब्लूएचओ WHO सदस्य देशांच्या …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांचा डॉलर चलनावरून ब्रिक्स देशांना इशारा नवे चलन निर्माण करण्याचा विचार सोडून द्या
राष्ट्राध्यक्ष-निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांना – ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका – यांना कडक इशारा दिला आहे की जागतिक व्यापारात अमेरिकन डॉलरला बाजूला ठेवण्याचा कोणताही प्रयत्न मोठी किंमत मोजावा लागेल. त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले की, “आम्ही उभे राहून पाहत असताना ब्रिक्स …
Read More »अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे सुतोवाच, आयात शुल्क कमी कऱण्याचा विचार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अर्थमंत्र्यांचे सूचक विधान
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, या समायोजनांचा स्थानिक व्यवसायांवर विपरित परिणाम होणार नाही याची खात्री करून भारत काही आयात कर कमी करण्याचा विचार करू शकतो. व्यापार धोरणांमध्ये हा संभाव्य बदल अमेरिकेचे अध्यक्ष-निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या अलीकडील टिप्पण्यांच्या प्रतिसादात आला आहे, ज्यांनी भारताच्या उच्च …
Read More »
Marathi e-Batmya