Tag Archives: atul bhatkhalkar

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट करून धार्मिक तेढ निर्माण करणा-या आ. अतुल भातखळकर यांना अटक करा

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी X (पूर्वीचे ट्वीटर) या सोशल प्लॅटफॉर्मवर केलेले ट्विट (लिंक: https://x.com/bhatkhalkara/status/1925130462118531179?s=46) अत्यंत द्वेषपूर्ण, धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि काँग्रेस पक्षाची व कार्यकर्त्यांची बदनामी करणारे आहे. सदर ट्विटमुळे समाजात वैरभावना आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना …

Read More »

सुधांशू त्रिवेदी यांचा आशावाद, महायुती सरकारच्या विकास कामांची पावती मतदार देणार वक्फ मुद्यावरून विरोधक गप्प का?

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी काम करत आहे. भाजपा सरकारने देशात- राज्यात विकासाचा मोठा टप्पा पार केल्याने भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने ५०० बिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. राज्यात महायुती सरकारने केलेल्या विकास कामांची पावती मतदार आगामी …

Read More »

धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठेयत विचारताच भाजपा आमदाराने उध्दव ठाकरेंचे नाव घेत… सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगला रंगला वाद

राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा संपत आला. मागील तीन आठवड्यात अनेकवेळा विरोधक वेगवेगळ्या विषयावरील प्रस्ताव मांडत असतात मात्र राज्य मंत्रिमंडळातील एकही मंत्री सभागृहात गैरहजर असल्याचे प्रसंग अनेक वेळा घडले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावणलेही त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर सभागृहात …

Read More »

संजय राऊतांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसादः पण हक्कभंग प्रस्तावावर अध्यक्षांची स्पष्टोक्ती दोन दिवसात तपासणी करून हक्कभंगाबाबत निर्णय घेऊ

संजय राऊतांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधताना राज्यात विधिमंडळ नाही, तर ४० जणांचे चोरमंडळ, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले असून या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. तसेच …

Read More »

छगन भुजबळ यांच्या फोटो मॉर्फिंगप्रकरणी भाजपाच्या भातखळकरांवर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधत आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, श्रध्दा वालकर हत्याप्रकरणी विशेष पोलिस पथक स्थापणार लव्ह जिहाद कायदा आणण्यासंदर्भातही सरकारची मानसिकता

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा आणण्याची मागणी भाजपाच्या विविध आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु असून आज विधानसभेत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी श्रध्दा वालकर हिच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. तसेच अशा हत्या रोखण्यासाठी लव्ह जिहाद …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, तर मला अमित शाह यांच्याशी चर्चा करावी लागेल

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. दरम्यान, ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, सध्या भाजपाला राष्ट्रवादीशिवाय काही दिवस नाही वेदांता प्रकल्प जाणे हे पाप शिंदे - फडणवीस सरकारचे

भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रावाला चाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेत आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला खोचक उत्तर देत म्हणाले, भाजपाला आता राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्याशिवाय कोणी दिसत नाही. त्यामुळे ते …

Read More »

भाजपाचा नवा आरोप: पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांचा हात अतुल भातखळकरांच्या आरोपापाठोपाठ भाजपा प्रदेशाध्यक्षांचीही मागणी

मुंबईतील बहुचर्चित पत्रावाला चाळप्रकरणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेत त्यांच्या चौकशी करण्याची मागणी केली. भातखळकर यांच्या मागणी पाठोपाठ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवानकुळे यांनीही अतुल भातखळकर हे अभ्यासू आमदार असल्याचे सांगत या मागणीला पाठींबा दिला. पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांची चौकशी करावी अशी मागणी …

Read More »

कोरोना काळात शालेय शुल्क नियामन समित्या कुठे होत्या? भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांचा सवाल

कोरोना काळात जेव्हा शाळा बंद होत्या मात्र शाळांच्या फी वाढ होत्या. पालक आक्रोश करीत होते, आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावत होतो. त्यावेळी या शुल्क नियमन समित्या काय करीत होत्या ? कुठे होत्या ? असा सवाल भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम २०११ मध्ये सुधारणा …

Read More »