Tag Archives: bhaskar jadhav

महाविकास आघाडीचा चहापानावर बहिष्कार, पत्राद्वारे सरकारला दिला इशारा हिवाळी अधिवेशानाला सोमवारपासून सुरुवात

राज्य विधिमंडशळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला सोमवारी ८ तारखेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असल्याची घोषणा राज्य सरकारला पाठविलेल्या पत्राद्वारे केली. तसेच राज्य सरकारच्या कारभारावरून टीका केली. महाविकास आघाडीने सरकारला लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे… प्रति. मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, भोंग्यांच्या दंडातील अर्धी रक्कम तक्रारदाराला संजय राऊत यांचे नाव न घेता विचारांच्या प्रदुषणाचे काही करता येत नाही

मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटविण्यात आले असून मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर सध्या भोंगा नाही. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एकूण १,६०८ अनधिकृत भोंगे हटवले असून, ही संपूर्ण कारवाई कोणताही तणाव निर्माण न होता शांततेत पार पडली असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अखेर …

Read More »

विरोधी पक्षनेते पदावरुन विधानसभेत विरोधकांचा सभात्याग प्रश्नोत्तराच्या तास सुरु होण्याआधीच भास्कर जाधव यांच्याकडून बोलायला सुरुवात

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होऊन आज दुसरा दिवस सुरु झाला. सकाळी प्रश्नोत्तराचा तासाची घोषणा करताच शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांसदीय लोकशाही राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार आहे पण विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरील …

Read More »

भास्कर जाधव संतापून म्हणाले, सरकार तुमचं आहे म्हणून मान-सन्मान काय ठेवणार की नाही विधानसभेत अजित पवार यांनी निवेदन केल्यानंतर भास्कर जाधव संतापले

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचे निवेदन वाचून दाखविले. त्या निवेदनावरून शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत केला. भास्कर जाधव यांच्या संतापाला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यावर उत्तर देत म्हणाले की, १८ जून रोजी यासंदर्भात निर्णय झाला आहे. फक्त …

Read More »

विधानसभेत भास्कर जाधव यांचा हल्ला बोल, तर पत्र मागे घेतो… विरोधी पक्षनेता पदी निवड का नाही ?

विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली. यावेळी अभिनंदनचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आल्यानंतर विरोधकांकडून भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, अधिवेशन संपत आले. आज शेवटचा दिवस आहे. उपाध्यक्ष पदाची निवड झाली, मात्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड का नाही झाली? असा सवाल उपस्थित केला. विधानसभेच्या विरोधी …

Read More »

शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव आणि शिवसेनाओएफसी निलेश राणे यांच्यात चकमक लक्षवेधी सूचनांवरून उडाली चकमक

विधानसभेच्या  कामकाजात दाखवण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनांच्या संख्येवरून शुक्रवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.  या दोघांमधील वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांचा  एकेरी उल्लेख केला. या गोंधळामुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार  अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊ लागले. तेव्हा  तालिका अध्यक्ष योगेश सागर …

Read More »

अजित पवार यांचा विरोधकांना टोला, तुमच्याकडे आमदारच नाही, १०-२० टाळकी पाठिंबा देणार का? शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव यांनी टाळकी शब्दावर घेतला आक्षेप

नुकताच होळी आणि धुलवड सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे यावे आम्ही त्यांना आलटून पालटून मुख्यमंत्री करू असे विधान केले. तसेच बुरा ना मानो होली है असे सांगायलाही विसरले नाहीत. त्यावरून राज्यात महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असल्याचे …

Read More »

शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा, मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणे मार्फत चौकशी मुंबई गोवा महामार्ग जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार

मागील काही वर्षापासून रखड़लेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणे मार्फत इन कॅमेरा चौकशी केली जाईल. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वर कड़क कारवाई केली जाईल. मात्र आता हा महामार्ग जानेवारी २०२६ पर्यन्त पूर्ण केला जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज विधानसभेत दिले. …

Read More »

शिवसेना उबाठाच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण, राजभाषा मराठीच भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकले नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे असे काही नाही असे मत एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्यानंतर त्याचे राजकिय पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात उमटले. विधानसभेत शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी राज्य सराकरने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. त्यावर बोलताना …

Read More »

शिवसेना उबाठा आक्रमकः मुंबईत मराठी बोललीच पाहिजे आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांच्या त्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक बोली भाषा बोलल्या जातात. मात्र मुंबईत रहायचे तर मराठी भाषा आलीच पाहिजे असा कायदा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना करण्यात आला होता. मात्र आरएसएसचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी नुकतेच मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही असे …

Read More »