नुकताच होळी आणि धुलवड सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे यावे आम्ही त्यांना आलटून पालटून मुख्यमंत्री करू असे विधान केले. तसेच बुरा ना मानो होली है असे सांगायलाही विसरले नाहीत. त्यावरून राज्यात महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर असल्याचे सांगत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंढीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र नाना पटोले यांच्या त्या आव्हानाला अर्थमंत्री अजित पवार यांनी आज उत्तर देत म्हणाले की, ब्रम्हदेव जरी आला तरी या सरकारला धक्का लावू शकणार नाही असे सांगत विरोधकांना कोपरखळीही मारली.
विधानसभेत अर्थसंकल्पिय चर्चेला उत्तर देताना अजित पवार हे चांगलेच रंगात येत म्हणाले, तुमच्याकडे (विरोधकांना उद्देशून) बघून सगळे जमा होत आलात ते बघून हसायलाच येत. तसेच तुम्ही एकत्रित आल्याने मला शेरोशायरी सुचत असल्याचे सांगत काल परवा कोणी तरी म्हणाले की, आमच्याकडे या आम्ही तुमला मुख्यमंत्री करू म्हणून पण तुमच्याकडे टाळकी तरी आहे का असा सवाल करत कुणाकडे १० तर कुणाकडे १५ तर कुणाकडे २० टाळकी आहेत असे वक्तव्य केले.
त्यावर शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत म्हणाले की, कृपया टाळकी म्हणू नका,
त्यावर अजित पवार म्हणाले, मी सर्व आमदारांना सन्मानीय सदस्यच म्हणत आलोय, त्यामुळे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका. पण कोणी काहीही बरळतय असे मी म्हणणार नाही पण बोलतय म्हणतो असेही यावेळी सांगितले.
तसेच अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प हा काही एक वर्षासाठी मांडला गेला नाही तर तो पुढील पाच वर्षासाठी मांडला गेला आहे. विकासाची अनेक कामे जाहिर करण्यात आली आहेत. तसेच ही विकासाची कामे सुरु आहेत. पण विरोधक म्हणतात की कुठेय विकास पण ती कामे पूर्ण झाल्यानंतरच केलेली कामे-विकास दिसेल असेही यावेळी म्हणाले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला पाठिंबा देतो असे कोणी गंमतीने जरी म्हणाले तरी ते शक्य नाही. तुमच्याकडे आमदारच नाहीत तर तुम्ही पाठिंबा कसला देणार आहात. केवळ १०-२० टाळकी आम्हाला पाठिंबा देणार का असा सवालही यावेळी केला.
शेवटी बोलताना अजित पवार म्हणाले की, पण मी एक सांगतो, पाच वर्षात ब्रम्हदेव जरी आला या सरकारला धक्का लावू शकणार नाही.
Marathi e-Batmya