Breaking News

Tag Archives: bmc

मुंबई, कोकणात अतिवृष्टी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाचा इशारा हवामान विभागाचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून सध्या पावसाने उघडीप दिलेली असली तरी पुढील दोन दिवसांत मुंबईसह कोकणात अतिवृष्टी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. पोषक स्थितीमुळे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस …

Read More »

शिवसेनेच्या आश्वासनाची सरकारकडून पूर्तता ५०० चौ.फु.पर्यंतच्या निवासी सदनिकांच्या मालमत्ता करात माफी

मुंबई :प्रतिनिधी  बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या कालावधीत पालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता राज्य सरकारकडून शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करत आगामी लोकसभा निवडणूकीच्यादृष्टीने नागरीकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यासाठी संबंधित अधिनियमामध्ये सुधारणा …

Read More »

महापौर महाडेश्वर यांच्यासह २१ अपात्र ठरलेल्या नगरसेवकांवर मेहेरनजर

मुंबई महापालिकेकडून अपात्र नगरसेवकांवर गुन्हे दाखल नाही मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत खोटी जात प्रमाणपत्रे सादर करत निवडूण आलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह २१ नगरसेवकांना अपात्र ठरविले. परंतु या अपात्र नगरसेवकांवर मुंबई महापालिकेने खास मेहेरनजर दाखवित यांच्यावर गुन्हाच दाखल करण्यात आलेला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. तसेच गुन्हा नोंदविण्याबाबत …

Read More »

महापालिका रूग्णालयातील आरोग्य सेविकांचे मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन

४००० हजार सेविकांचे आंदोलन  मुंबई : प्रतिनिधी  मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रूग्णालयातील आरोग्य सेविकांना किमान वेतन कायदा लागू करावा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी गेले दोन  दिवस संपावर असलेल्या आरोग्य सेविकांनी आज बुधवारी थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात तब्बल ४००० …

Read More »

मुंबईकरांसाठी कोस्टल रोड टोलमुक्त रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांनी शिवसेनेला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे निवडणूकीत जी आश्वासन देतो ती आम्ही पूर्ण करत असून स्वप्न वास्तवतेत उतरविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येतात. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबईकरांच्या सेवेसाठी कोस्टल रोड उभारणीच्या कामास मुंबई महापालिकेकडून सुरुवात करण्यात येत असल्याचे जाहीर करत हा रोड टोल मुक्त राहणार असल्याची घोषणा …

Read More »

मुंबईच्या विकास आराखड्यावर १३.५९ कोटींचा खर्च एकट्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख रूपयांचा खर्च झाला

मुंबईः प्रतिनिधी बहुप्रतिक्षित असा मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजमितीपर्यंत १३.५९ कोटी रुपये खर्च झाला आहे. तर आराखडा समितीवर विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख खर्च आणि सूचना व हरकती सुनावणीसाठी आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या 3 माजी सेवानिवृत्त अधिका-यांच्या …

Read More »

मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या करमाफी आश्वासनाचे काय झाले ? शिवसेना आमदारांची नगरविकास विभागाला विचारणा

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणूकीच्या कालावधीत 500 चौरस फुट क्षेत्रफळाच्या सदनिकेत राहणाऱ्या मुंबईकरांना मालमत्ता करात माफी देण्याचे आश्वासन सत्ताधारी शिवसेना व भाजपने दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईकरांचे मन जिंकून घेण्यासाठी विधानसभेत आश्वासन दिले. परंतु त्यास पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी मुंबईकरांना करमाफी देण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने …

Read More »

नालेसफाईची माहिती प्रसिध्द करण्याबरोबरच गाळ टाकण्याचे चित्रिकरण करा स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करण्याचा भाजप मुंबई अध्यक्ष अँड.आशिष शेलार यांचा महापालिकेला इशारा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील नालेसफाईबाबत महापालिका, रेल्‍वे प्रशासनासोबत‍ दोन वेळा बैठक घेत्‍यानंतर तसेच प्रत्‍यक्ष कामाची पाहणी करून मुंबईतील भाजप नगरसेवकांनी केलेल्‍या पाहणीचा आढावा घेतल्‍यानंतर आज पत्रकारांशी बोलताना महापालिकेच्‍या स्‍थायी समितीने नालेसफाईच्‍या कामांबाबत सावधानता बाळगावी, दर आठवड्याला नाले सफाईची माहीती प्रसिध्द करण्याबरोबरच डंपींग ग्राऊंडवर गाळ टाकण्याचे सीसीटीव्हीद्वारे चित्रिकरण करण्याची सूचना भाजप …

Read More »

मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ माहिती अधिकार कायद्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील इमारतींना आगी लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून मुंबई अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन …

Read More »

मुंबई महापालिकेच्या विभाजनावरून भाजप-काँग्रेस समोरासमोर तर शिवसेनेला उशीराने जाग ; सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई महापालिकेचे तीन भागात विभागण करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली. मात्र भाजपने याचा राजकिय फायदा उठविण्यासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडण्यासाठी काँग्रेसकडून हा प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी भाजप …

Read More »