पवई भागातील जय भीम नगरमधील झोपड्या तोडल्याचा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले म्हणाले की, जयभीम नगरमधील ६५० गरिब, मागासवर्गिय कुटुंबांवर ६ जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे, आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय …
Read More »मुंबई महापालिकेचा अजब कारभार, एका निविदेत कंपनी अपात्र तर दुसऱ्यात पात्र एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र कशा
मुंबई महानगरपालिकेतील परिमंडळ ६ आणि ५ अंतर्गत २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंर्तीच्या दुरुस्ती/पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारचा चमत्कार झाला आहे. एका निविदेत अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र झाली असून याबाबत चौकशी करत पुन्हा योग्य निविदा जारी करण्याची मागणी आरटीआय …
Read More »मान्सूनला उशीर?, मुंबईकरांनो पाणी कपात, पाणी जपून वापरा शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईत पाणी कपात लागू
राज्यातील उन्हाळा मौसम चांगलाच उष्ण राहिल्याने नागरिकांप्रमाणेच शेतकऱी, जनावरांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मागील वर्षीच्या मौसमात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने २०२४ साल उजाडताच जानेवारी महिन्यातच राज्यात पाण्याचा टँकरने पाणी पुरवठ्यास सुरुवात झाली. त्यातच यापूर्वी हवामान खात्याने वेळेआधी मान्सून सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले. मात्र अद्याप तरी मान्सून …
Read More »आशिष शेलार यांची खोचक सवाल, उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का? उद्धव ठाकरे यांच्या परदेश वारीवरून केली टीका
पश्चिम उपनगरातील नालेसफाईची आज तिसऱ्या दिवशी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पाहणी केली. पश्चिम उपनगरातील नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचे यावेळी नमूद करत उध्दव ठाकरे कुठे आहेत? लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का? असा खोचक सवाल अॅड आशिष शेलार यांनी केला. मुंबईतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने …
Read More »आशिष शेलार यांचा सवाल, खाजगी डम्पिंग ग्राउंड आँडिट झाले का? मोगरा आणि इर्ला नाल्याच्या सफाईची पहाणी
नाल्याचा गाळ वसईतील ज्या खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो आहे, त्याचे ऑडिट करण्यात आले आहे का? असा सवाल करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाई बाबत असमाधानी असल्याचे आज सांगितले. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा …
Read More »ॲड प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, घाटकोपर दुर्घटनेतील मृत्यूला बीएमसी जबाबदार
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित असून, ती हत्येपेक्षा कमी नाही. या ‘हत्यांना’ बीएमसी BMC शिवाय कोणीही जबाबदार नाही, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या मानवनिर्मित दुर्घटनेतील पीडितांमध्ये दोन रिक्षाचालक, एक कॅब ड्रायव्हर, एक टूरिस्ट ड्रायव्हर, एक डिलिव्हरी बॉय आणि एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डींग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप करत …
Read More »सेव्हन हिल्सवर महानगरपालिकेचा महिन्याला ९ कोटी खर्च तर दरमहा ४ कोटींचे नुकसान
अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबईच्या आरोग्य सुविधांसाठी अत्यंत महत्वाचे व मोक्याचे हॉस्पिटल आहे, सध्या न्यायप्रविष्ठ असलेले हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेनेचे चालवले पाहिजे अशी सातत्याने मागणी केली जात आहे. २०२० पासून महानगरपालिका या हॉस्पिटलवर दरमहिना ९ कोटी रुपये खर्च करते आणि उत्पन्न केवळ ५ कोटी रुपये होत आहे. महापालिकेला महिन्याला …
Read More »इक्बाल सिंह चहल थेट मुख्यमंत्री कार्यालयातः आदित्य ठाकरे यांची टीका
लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होताच निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले. परंतु राज्य सरकारने राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या ऐवजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना महानगरपालिकेच्या पदावर कायम ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर सुरु केला. मात्र अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इक्बालसिंह चहल यांची …
Read More »अखेर निवडणूक आयोगाने बदली केलीच, नवे मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी
मागील महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एकाच ठिकाणी एखादा अधिकारी तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी राहिला असेल तर अशा आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र राज्य सरकारकडून मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली करू नये यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना दोन वेळा पत्र …
Read More »
Marathi e-Batmya