Tag Archives: cabinet decision

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले… जमिन वाटप, अतिक्रमण निश्चित, कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्याचा निर्णय

कालपासून सातत्याने हवामान विभागाच्या हवाल्याने राज्य सरकारकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येत होता. त्याअनुषंगाने राज्य सरकारकडून सातत्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला तयार राहण्याचे आदेश देण्यात येत होते. मात्र राज्यात एकाबाजूला पावसाने थैमान घालत असताना मात्र दुसऱ्या बाजूला राज्यातील मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत आपल्या कामसू वृत्तीची चुणूक की, हट्टाहास …

Read More »

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील …

Read More »

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे. अंत्योदय …

Read More »

शासन मालकीच्या चिंचोळ्या, अयोग्य आकाराच्या, लँड लॉक्ड भुखंडाच्या वितरणाचे धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

शासनाच्या मालकीच्या चिंचोळ्या, स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य, उपयुक्त आकार नसलेल्या (shape), सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँड लॉक्ड स्वरूपातील शासकीय किंवा नझूल जमिनींच्या वाटपासाठी धोरणास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. अशा प्रकारच्या जमिनी भूखंडधारकांना त्यांच्या विद्यमान धारणाधिकाराच्या स्वरूपानुसारच देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घराच्या मागील बाजूस असलेल्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी उमेद मॉल, महिलांसाठी न्यायालय यासह काही महत्वाचे निर्णय

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत उमेद मॉल, महिलासांठी न्यायालय, पिंपरी-चिंचवडसाठी न्यायालयासह, शेतकऱ्यांसाठी बाजारतळ, बोर आणि धाम येथील सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र गोवा येथील वकीलांसाठी ठाण्यातील जमिन देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्य …

Read More »

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच या अभियानातील पुरस्कारांकरिता दरवर्षी २९० कोटी ३३ …

Read More »

अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश, पिंपरी-चिंडवडमध्ये न्यायालय पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयासह वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रीमंडळाने आज मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. उद्योग नगरी म्हणून ख्याती असणाऱ्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी ८६२ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर, थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी …

Read More »

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार, निर्वाह, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्यभरात विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसत‍िगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यांमध्ये सुमारे दुपटीने वाढ करण्यात आली असून शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय आज …

Read More »

वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंडाचे पीडब्लूडीस निशुल्क हस्तांतरण नि:शुल्क हस्तांतरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी

वांद्रे (पूर्व) येथील उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागास नि:शुल्क हस्तांतरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीतील ९० एकर जागेपैकी ३०.१६ एकर भूखंड उच्च न्यायालयास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भूखंडावर उच्च न्यायालयाकरिता नवीन संकूल …

Read More »