टेक अब्जाधीश एलोन मस्क यांनी मंगळवारी एक्स वर न्यू यॉर्क सिटी बॅलेट पेपरची एक फोटो शेअर केला, त्याला घोटाळा म्हटले आणि अमेरिकन निवडणुकीपूर्वी मतदान प्रक्रियेच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “न्यू यॉर्क सिटी बॅलेट फॉर्म हा एक घोटाळा आहे! ओळखपत्र आवश्यक नाही. इतर महापौरपदाचे उमेदवार दोनदा दिसतात. कुओमोचे नाव तळाशी उजवीकडे …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता, पण ते आमच्या विचारांचे नाहीत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास सुरु
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. निवडणुकीत त्यांना मतदान करण्याची विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना फोन केला. परंतु राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची विनंती अमान्य करत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी राज्यपाल असलेल्या सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात अटक करण्याचे आदेश दिल्याचा दाखला देत …
Read More »आरटीआयमधून स्पर्धा परिक्षेतील इतरांचेही गुण पाहता येणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला
सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला, ज्यामध्ये असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते की माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत सार्वजनिक परीक्षेत इतर उमेदवारांनी मिळवलेले गुण जाहीर करण्याची विनंती सार्वजनिक हितासाठी नाकारता येत नाही. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी एका रिट याचिकेत दिलेल्या आदेशानुसार, उच्च न्यायालयाने प्रतिवादीची पुणे जिल्हा न्यायालयात …
Read More »नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताः दोन आठवड्यानंतर सुनावणी नियमित जामीन अर्जावर उच्च न्यायालयात दोन आठवड्यांनी सुनावणी
माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते नवाब मलिक सध्या अंतरिम वैद्यकीय जामीनावर बाहेर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याने ते सध्या कोणत्याही आडकाठीविना प्रचारात व्यग्र असल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने गुरूवारी दखल घेतली. मलिक यांनी नियमित जामीनासाठी काही महिन्यांपूर्वी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आणि गुणवत्तेच्या आधारे त्यावर निर्णय देण्याचे …
Read More »नवाब मलिक यांना पुन्हा ईडीकडून अटकेची शक्यता ? उच्च न्यायालयात धाव घेतल्याने अटकेची शक्यता बळावली
सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना ३० जुलैला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय जामीन घेताना त्यांनी आपले अनेक अवयव निकामी झाले असून तातडीच्या उपचारांची गरज आहे, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे उच्च न्यायालयात नवाब मलिकांच्या जामीनाचे प्रकरण प्रलंबित असल्याने तो निर्णय लागत …
Read More »उच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला सुचना इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्याचे प्रशिक्षण द्या
आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, उमेदवारी अर्ज कसे भरावेत, याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी सुचना उच्च न्यायलयाने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) निवडणुकीचे नामांकन अर्ज कसे भरायचे याबद्दल इच्छूक उमेदवारांना प्रशिक्षण द्यावे, अर्ज कसा भरावा, त्याबाबत जागरूकता निर्माण …
Read More »मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मतदारासंघाची घोषणा, कुठे पाडणार-कुठे उमेदवार देणार मराठवाड्यातील शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा, राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार पाडणार
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजपाचा सुफडा साफ करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या विरोधात उमेदवार देत निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही केली होती. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतील विजयी होण्यासाठी लागणाऱ्या मतांचे गणित जुळवित कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार कोणत्या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडणार याबाबतचे मतदारसंघ …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची माहिती, उमेदवार आणि मतदारसंघ जाहिर करणार मराठा समाजाच्या उमेदवार आणि मतदारसंघ उद्या जाहिर
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला धडा शिकविण्याचा चंग बांधलेल्या मराठा आरक्षण समर्थक आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचे उमेदवार उभे कऱण्याचे आदेश दिले. त्यानंतर निवडणूकीचे गणित म्हणून दलित मुस्लिम मराठा समाजाच्या धर्मगुरुंची आणि प्रभावशाली व्यक्तींची बैठकही घेतली. त्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याच्या दिवशी …
Read More »निवडणूकीच्या खर्चाच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी आयोगाने दिले हे आदेश विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार, प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी …
Read More »एसटी महामंडळाचा मोठा निर्णयः २०१९ च्या भरतीच्या यादीतील उमेदवारांना घेणार १०५८ उमेदवारांना सामावून घेणार-एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती
सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना …
Read More »
Marathi e-Batmya