मोगलांच्या सैनिकांनी धसका घेतल्याने त्यांना जसे सर्वत्र संताजी-धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरे यांना सर्वत्र शिंदे – फडणवीस दिसतात असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी संताजी धनाजींसारखा शिंदे फडणवीसांचा धसका घेतला आहे. त्यांना ते सर्वत्र दिसतात. …
Read More »उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादीला मत
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली व त्यांचे विचारही स्वीकारले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला मत असेल. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते घरोघर जाऊन याबद्दल जागृती करतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सांगितले. ते मुंबई …
Read More »उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बावनकुळे आणि परब यांच्याकडून परस्पर पूरक दावे दोघांनीही केला आपलाच उमेदवार विजयी होण्याचा दावा
अंधेरी विधानसभा पोट निवडणूकासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून ऋतुजा लटके आणि संदीप नाईक या दोघांनी अर्ज भरले. तर भाजपा-शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा …
Read More »राष्ट्रवादी नेते सुनिल तटकरे यांच्या पुतण्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या बंधुचे चिंरजीव अर्थात पुतणे अवधूत तटकरे यांनी आज अखेर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबऴ उडाली आहे. अवधूत तटकरे यांनी आज शुक्रवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. माजी आमदार …
Read More »भाजपा मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी, नाना तुम्ही मशालीची चिंता करा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करावी, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी बुधवारी लगावला. ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेत …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव व मशाल हे नवीन चिन्ह धारण करण्यास मान्यता दिल्यांनंतर भाजपाने यावर टीका करीत या घडामोडींना भाजपा जबाबदार नसल्याचे सांगतानाच पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव …
Read More »राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याने त्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील सरस्वती पूजन हे मनापासून झाले की, संपूर्ण राज्यातील हिंदू समाजाने टीका केल्यामुळे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी …
Read More »‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांना राज्यातून पंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पंधरा लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे भारतीय जनता पार्टीचे ‘धन्यवाद, मोदीजी’ अभियान रविवारी सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानात मुंबईत गोरेगाव मतदारसंघात पन्नास लाभार्थ्यांशी संपर्क साधला. बावनकुळे यांनी पत्रकारांना अभियानाची माहिती दिली. …
Read More »मराठा जागर परिषदेचे अध्यक्ष प्रा. पाटील यांचा सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मराठा जागर परिषद या संघटनेचे अध्यक्ष व युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संभाजी दादाराव पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष …
Read More »वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी खोटारडेपणाबद्दल मविआ नेत्यांनी माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे उभारण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणताही करार झालेला नव्हता आणि कंपनीला त्या प्रकल्पासाठी कोणताही भूखंड दिलेला नव्हता असे स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाला असून याविषयात खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya