मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीच्या कामकाजासाठी अनेक कर्मचारी, अधिकारी गुंतलेले असल्याने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि शिक्षकांना वेतन देणार नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र याप्रश्नी सरकारी कर्मचारी संघटनेने कठोर भूमिका घेत पगार दिवाळीपूर्वीच मिळावी अशी मागणी केली. या मागणीला राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत …
Read More »३५० एकर मिठागरांची जमिन आता लवकरच खुली होणार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
मुंबईः खास प्रतिनिधी सर्वांसाठी घरे या योजनेसाठी मुंबईतील एक हजार एकरहून अधिक असलेली मिठागरांची जमिन उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र त्यास तब्बल तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर राज्य सरकारला जाग आलेली असून ऐन निवडणूकीच्या धामधुमित ही जमिन खुली करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या …
Read More »भाजपाने २०१९ च्या संकल्प पत्र जाहीर करताना २०१४ चा जाहीरनामा वाचायला हवा होता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी किमान आपलाच प्रसिद्ध केलेला २०१४ चा जाहीरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने ही २०१४ सालीच दिलेली आहेत. ही आश्वासने पूर्ण का झाली नाहीत याचेही उत्तर याच जाहीरनाम्यात भाजपने देणे अपेक्षित होते असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …
Read More »मुख्यमंत्री म्हणतात इथे निवडणूक नाही..मग पंतप्रधान-गृहमंत्री कशाला येतायत ? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सवाल
अहमदनगर – राहुरीः प्रतिनिधी मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्रात निवडणूकच नाही… इथे विरोध करायला माणसंच नाहीत… निवडणूकीची मजा येत नाही… चांगली गोष्ट आहे निवडणूकीची मजा येत नाही तुम्हाला… मग देशाचे पंतप्रधान नऊ वेळा महाराष्ट्रात का येतात… विरोधकच नाही मग गृहमंत्री कानाकोपऱ्यात फिरुन २० सभा का घेतात… मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्यात का हिंडतात असा …
Read More »शिवाजी महाराज स्मारक, डॉ.आंबेडकर स्मारक आगामी पाच वर्षात पूर्ण करण्याचा भाजपाचा संकल्प आगामी पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलून जाण्याचा भाजप कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांचा विश्वास
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे श्रध्दास्थान आणि प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करत सत्तेवर आलेल्या या दोन्ही स्मारकाचे काम अद्याप पूर्ण करता आले नाही. त्यामुळे या दोन्ही स्मारकाचे काम आगामी पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचा संकल्प भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करत १ कोटी नोकऱ्यांची …
Read More »सरकारच्या दबावाखाली दूरदर्शन विरोधकांचा आवाज दाबतेय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी सरकारच्या दबावाखाली विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा दूरदर्शन प्रयत्न करत असून मतदानासाठी आवाहन करण्याच्या काँग्रेसच्या स्क्रिप्टमध्ये परस्पर बदल करण्यात आला आहे. दूरदर्शनचा हा प्रकार संताप आणणारा असून विरोधकांच्या संवैधानिक मत स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी …
Read More »धारावीचा पुनर्विकास १० वर्षासाठी रखडला निविदा प्रक्रियाच पुन्हा नव्याने होणार
मुंबईः खास प्रतिनिधी २५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास पुन्हा एकदा १० वर्षासाठी रखडणार आहे. यापूर्वी मार्गी लागलेली निविदा प्रक्रिया नव्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्यातील गतीमान सरकारने साधारणतः दोन वर्षापूर्वी धारावीच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी नव्याने निविदा मागविली होती. …
Read More »भिवंडी मेट्रो कारशेडसाठी जागा पाहिजे तर बाजार भावाप्रमाणे मोबदला द्या कोन-गोवे संघर्ष समितीची मागणीमुळे भिवंडीतील मेट्रोचा मुद्दा चिघळणार
ठाणेः प्रतिनिधी भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी सरकारी जमिनीऐवजी आमच्या खासगी जमिनी संपादीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकहिताचा प्रकल्प असल्यामुळे जमिनी देण्यास आमचा विरोध नाही. परंतु सरकारने आम्हाला बाजार भावाप्रमाणे जमिनीचा चांगला मोबदला द्यावा, अशी मागणी कोन-गोवे संघर्ष समितीने शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिली. बाजार भावाप्रमाणे जमिनीचा मोबदला देणार नसाल तर …
Read More »गतीमान सरकारने सांस्कृतिक खात्याला दिले पाच वर्षात १४ संचालक संचालकांची नियुक्ती म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संगीत खुर्चीचा खेळ
मुंबईः प्रतिनिधी राज्यात पाचवर्षापूर्वी गतीमान सरकार पारदर्शक सरकारचा नारा देत आलेल्या भाजपा-शिवसेनेने अगदीच गतीमान कारभार करत गेल्या पाच वर्षात सांस्कृतिक कार्य संचालनालायच्या संचालक पदी पाच वर्षात तब्बल चौदा अधिकाऱ्यांची नियुक्ती करत “संगीत खुर्चीचा” रेकॉर्ड ब्रेक खेळ मांडल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. खात्यात अथवा एखाद्या महामंडळात किमान दोन वर्षे तरी …
Read More »इंदिरा गांधींनी भूगोल बदलला मात्र सैन्याचे श्रेय घेतले नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपवर टीका
अकोला – बाळापुरः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानने पुलवामा येथे एक शहाणपणा केला. त्याला आपल्या वायूदलाने चोख प्रतिउत्तर दिले. या देशात सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा उपयोग मतासाठी केला नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भूगोल बदलला. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत घेतले नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »
Marathi e-Batmya