मुंबई : प्रतिनिधी बदलत्या काळात कला प्रकार लुप्त होत असताना केवळ आपल्या अतुलनीय कामगिरीच्या माध्यमातून आदीवासी समाजाची वारली चित्रकला फक्त जागतिकस्तरावर नेता सर्वमान्यता मिळवून देणारे वारली चित्रकार पद्मश्री जीव्या म्हसे यांचे वृध्दपकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने वारली चित्रकला पोरकी झाल्याची भावना चित्रकलावंतामध्ये निर्माण झाली …
Read More »पलुसमध्ये भाजपची माघार मात्र पालघर मध्ये शिवसेनेचा नकार भाजपची राजकिय कोंडी
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यातील पलूस विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत आहे. या निवडणूकीत काँग्रेसकडून कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा शिवसेनेने पाठिंबा देत उमेदवार न देण्याचे जाहीर करत पाठिंबा दिला. मात्र भाजपने संग्रामसिंह देशमुख यांना …
Read More »राजकीय हित साधण्यासाठीच सरकारकडून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप
औरंगाबाद : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव आणि औरंगाबाद येथील घटना पाहता सामाजिक अशांतता निर्माण करुन राजकीय हित साधण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो. स्थानिक पातळीवर सत्ताधारी पक्षाचे खासदारही प्रक्षोभक वक्तव्य करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार का? असा सवाल करुन औरंगाबाद येथील घटनेत गृहखाते पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी …
Read More »बीडीडी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला राज्य सरकारच्या होकाराची प्रतिक्षा म्हाडाकडून फक्त ३ हजार ५०० कोटीचे फायनान्शियल मॉडेल तयार
मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे ना.म.जोशी रोड, वरळी, नायगांव येथील खुराड्या वजा घरात रहात असलेल्या बीडीडीतील चाळकरी मुंबईकरांना ५०० चौ.फु.चे घर मिळणार आहे. या चाळींच्या पुर्नविकासासाठी म्हाडाला तब्बल ४५ हजार कोटीं रूपयांची गरज लागणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ३ हजार ५०० कोटी रूपयांचे फायनान्शियल मॉडेल म्हाडाने तयार केले …
Read More »मुंबईत १५ तारखेपासून सेवा क्षेत्रातील उद्योगांचे जागतिक प्रदर्शन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’च्या यशानंतर मुंबईत प्रथमच चार दिवसांची ‘ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हीसेस’मुंबईत येत्या १५ तारखेपासून आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला २२ सेवा क्षेत्रातील १०० देशांमधून पाच हजार पेक्षा जास्त सेवा उद्योजक सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते होणार असून, राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग …
Read More »औरंगाबादच्या हिंसाचारास मुख्यमंत्र्यांचे गृहखाते जबाबदार विधानसभा विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादचा हिंसाचार हे राज्य सरकारचे मोठे अपयश असून, पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळेच शहराची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. कायदा सुव्यवस्थेच्या निर्माण झालेल्या प्रश्नाला गृह खातेच जबाबदार असल्याचा आरोप करून या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. औरंगाबादच्या हिंसाचारासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त …
Read More »सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आणखी एक बळी ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचे टिकास्त्र
नांदेड : प्रतिनिधी कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरुन सुध्दा न मिळालेली कर्जमाफी व पिकविलेल्या शेतीमालास मिळालेला कवडीमोल भाव, यामुळे अडचणीत आलेल्या यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शेतकरी शामराव भोपळे यांनी भाजप सरकारला जबाबदार धरत स्वतःला जाळून घेतले. त्यांनी मृत्यूशी झुंज देत आज अखेरचा श्वास घेतला. शामराव भोपळे यांची आत्महत्या नसून ही …
Read More »परवडणाऱ्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात असाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निर्देश देत नियोजन प्राधिकरण म्हणुन म्हाडाची नियुक्ती
मुंबई: प्रतिनिधी परवडणारी घरे ही किमतीने सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणारी असावी असे सांगत सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी)अंतर्गत परवडणा-या घरांची होणारी निर्मीती ही गुणवत्तापुर्ण असावी यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत मुल्यमापन करण्याची सुचना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी म्हाडाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले. आज सहयाद्री येथे सर्वाना परवडणारी …
Read More »अखेर खेडचा सेझ रद्द मुख्यमंत्र्यांकडून जमिन हस्तांतरण शुल्क माफ : स्थानिक शेतकऱ्यांकडून सत्कार
मुंबई : प्रतिनिधी ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे,त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये अशीच शासनाची भुमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिल्याचे सांगत पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर-खेड मधील निमगांव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावातील सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र रद्द केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासावर वर्षाकाठी सरासरी ६ कोटींचा खर्च हेलिकॉप्टर अपघात आणि वैमानिकांच्या कमतरतेमुळे खर्चात वाढ
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासावर वर्षाकाठी सरासरी ६ कोटी रूपयांचा खर्च होत असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. हेलिकॉप्टर अपघात आणि वैमानिकांच्या कमतरतेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर आणि विमान प्रवासाच्या खर्चात वाढ झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल …
Read More »
Marathi e-Batmya