Tag Archives: cm fadnavis

सरकारने कर्जमाफी तर दिली, पण माहीतीच नाही दप्तरी जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात उघड

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करत १४ हजार ३८८ कोटी रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ ४६ लाख ५२ हजार देण्यात आला. मात्र या कर्जमाफीचा लाभ मिळविणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय माहितीच राज्य सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. त्यामुळे …

Read More »

धनगर आरक्षण पेटण्याची शक्यता? रासप आणि राज्य सरकारबाबत धनगर ऐक्य परिषदेत भूमिका ठरणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यास आता साडेतीन वर्षे झाली. त्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झाली करण्यात आली नाही. यापार्श्वभूमीवर येत्या २२ एप्रिलला सांगलीत धनगर ऐक्य परिषदेने समाजाचा महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यात धनगर …

Read More »

भाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

सोलापूर-टेंभुर्णी : प्रतिनिधी सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा शब्दात अजित पवारांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. धरणात पाणी भरलेलं असतानाही शेतकऱ्यांना पाणी देत नाहीय. वीज कनेक्शन तोडण्याचे काम करत …

Read More »

भिडे-एकबोटे : महिला कार्यकर्त्यांना सोशल मिडीयावर शिव्यांची लाखोली सावळे आणि अंधारे यांना पोलिस संरक्षण देण्याची भीम आर्मीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव येथील दलित हिंसाचाराच्या प्रकरणी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच त्याचा पाठ पुरावा करत असल्याने याप्रकरणातील तक्रारकर्त्या आणि दलित कार्यकर्त्या अनिता सावळे आणि सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या प्रा. सुषमा अंधारे यांच्या विरोधात सोशल मिडीयावर सध्या ट्रोलिंग …

Read More »

भाजपच्या मुखात शिवाजी महाराज आणि हृदयात छिंदम २०१९ ला खोटारड्या भाजपची हकालपट्टी निश्चित: खा. अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी गोळवलकरांच्या विचारधनातून आलेला संघाचा मनुवाद जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी करत आरक्षण हटवू देणार नाही असे कितीही …

Read More »

वादग्रस्त जागेवरील राम मंदीर उभारणीचा मुद्दा विरोधकांचा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे घुमजाव

मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील वादग्रस्त वास्तू पडल्यानंतर राम मंदीर उभारणीबाबचा मुद्दा भाजपच्या प्रत्येक निवडणूकीच्या जाहीर नाम्यात प्रसिध्द करण्यात आला आहे. मात्र त्या वादग्रस्त जागेवर राम मंदीर उभारणीबद्दल भाजप कधीच बोलत नसल्याचा खुलासा करत त्या वादग्रस्तच्या जागेवर राम मंदीर उभारणीबाबत विरोधकांकडूनच केला जात असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी …

Read More »

चहावाल्यांच्या नादीला लागाल… तर औषधालाही शिल्लक राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवारांना आव्हान

मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी आमच्या काळात इतका चहा पित नव्हतो असे सांगत आमच्या चहा पिण्यावर टीका केली. मात्र आम्ही जे स्वत: पितो, तेच आम्ही लोकांना देतो. परंतु तुमचे राष्ट्रवादीवाले जे पितात ते आम्हीही पिवू शकत नाही आणि दुसऱ्यालाही पाजू शकत नाही. २०१४ साली तुम्ही चहा वाल्याच्या …

Read More »

कार्यकर्त्ये म्हणतात आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची सोय झाली असती भाजपच्या महामेळाव्यावर मनी पॉवरची सांस्कृतिक छाप

मुंबई : प्रतिनिधी कधी काळी सभेला गर्दी जमविण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी नागरीकांना पैसे दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजपकडून आता भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यासाठीही भाजपाने कार्यकर्त्यांना पैसे वाटप केल्याचे उघडकीस येत आहे. मुंबईत पोहोचलेले कार्यकर्त्ये सभेच्या ठिकाणी जायच्या ऐवजी मौज मजा करण्यासाठी मुंबई पर्यटनासाठी जात असून आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची …

Read More »

सरकारी आरोग्य केंद्रांत वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची फिलिप्स कंपनीची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फिलिप्सचे मेझॉन यांच्यात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सरकारी आरोग्य केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण सुविधा पुरविण्याबाबत फिलिप्स कंपनीने तयारी दर्शविली असून प्रस्तावावर अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला दिल्या. फिलिप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोग्य विषयक प्रस्तावावर विस्तृत चर्चा केली. …

Read More »

वाघ आणि सिंह एकत्र ? सध्या शिवसेनेचा विषय अजेंड्यावर नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी आगामी २०१९ च्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनंतर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघ आणि सिंह हे एकत्र असल्याचे जाहीर करत शिवसेनेबरोबरील भाजपची युती कायम राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यास काही दिवसांचा अवधी जात नाही तोच भाजपचे …

Read More »