Tag Archives: congress

अतुल लोंढे यांचा सवाल, जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात ?

भारतीय जनता पक्षाला निवडणुका आल्या की जनतेची आठवण येते व इव्हेंटबाजी करुन जनतेचे कैवारी असल्याचा आव आणतात. आताही निवडणुकांचे दिवस सुरु असल्याने भाजपा नेते टिफिन बैठका घेत आहेत. भाजपाच्या आशिर्वादाने देशातील जनता महागाईने एकवेळचे जेवणही करु शकत नाही आणि भाजपा नेते मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण मागवून टिफीन बैठका घेण्याची …

Read More »

एच. के. पाटील म्हणाले, …भाजपामुक्त महाराष्ट्रचा काँग्रेसचा निर्धार

कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेऊन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यात पक्ष संघटना बळकट करुन जास्तीत जास्त जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मोठ्या विजयाने महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना अधिकचे बळ मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला …

Read More »

काँग्रेसची खोचक टीका, ‘केरला स्टोरी’प्रमाणे मुंब्रा स्टोरीही बोगस.. क्लस्टर डेव्हलमेंटच्या सवलतींचा फायदा सरसकट सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी व्हावा:- नसीम खान.

शिंदे फडणवीस सरकारने मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेसाठी रिअल इस्टेट डेव्हलपर्सना देय असलेल्या प्रीमियमवर एक वर्षाच्या कालावधीसाठी ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ३० मे २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेला हा निर्णय मुंबईतील चार पाच बिल्डरांच्या फायद्यासाठीच घेतलेला आहे. या निर्णयात शिंदे सरकारने बदल करून ही सवलत सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, वसुलीबाज कृषी मंत्री अब्दुल सत्तार… स्विय सहायक दिपक गवळी प्रकऱणावरून काँग्रेसने केली मागणी

अकोल्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाने धाडी टाकून व्यावसायिकांकडून पैसे मागितल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या धाड पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी सह इतर अनेक खाजगी लोकांचा समावेश होता. तर आपल्याच सांगण्यावरून या धाडी टाकण्यात आल्या आहेत, त्यात चुकीचे काहीच झाले नाही असे कृषीमंत्री …

Read More »

लाठीचार्जवरून विरोधकांचा फडणवीसांवर, तर भाजपाचा उद्धव ठाकरें आडून पलटवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळातील घटना

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप होतो आहे. त्यावरुन विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. या आरोपावरून सत्ताधाऱ्यांकडून आता असा प्रकार घडलेला नाही. विरोधक राजकारण करत आहेत, खरंतर अशा गोष्टींचं राजकारण करायचं नसतं तरीही ते केलं जातं आहे असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया देत सरकारची बाजू …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … वारीची बदनामी करण्याचा फडणवीस भाजपाचा प्रयत्न

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र ते दिसत नाही. लाठीचार्जचे व्हीडीओ डिलीट करण्यासाठी आता सरकारकडून मीडियावर दबाव आणला जात आहे आणि दुसरीकडे लाठीहल्ला झालाच नाही, असे फडणवीस निर्लज्जपणे सांगत …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, वारीतील प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपये द्या अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे उच्चाटन करण्यात वारीचे मोठे योगदान

पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे कार्यही होत असते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वारीतील दिंड्यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या …

Read More »

अतुल लोंढे यांचा सल्ला; अध्यक्षांनी क्रांतीकारी नाही, तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा राज्यात एक वर्षापासून शिंदे-फडणवीसांचे असंवैधानिक व बेकायदेशीर सरकार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन महिना झाला तरी अद्याप आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही. विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांचे क्रांतीकारी निर्णय घेण्याचे विधान त्यांचा कल लक्षात आणून देतो. विधानसभा अध्यक्ष पूर्वग्रहदूषीत असणे लोकशाहीसाठी योग्य नाही. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय क्रांतीकारी नाही तर संविधानातील …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप,… महाराष्ट्रात शिंदे फडणवीसांचे जंगलराज कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर सत्ता सोडा, आमचे सरकार आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांना सुतासारखे सरळ करू

गेल्या काही दिवसांत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दररोज हत्या, बलात्कार, दंगली, विरोधकांना धमक्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. राज्याची राजधानी आणि सुरक्षित शहर असणा-या मुंबई आणि परिसरात दररोज बलात्कार आणि हत्येच्या घटना घडत आहेत. आता विरोधी पक्षाच्या नेत्यांना खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत? राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून …

Read More »

आमदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात, पंतप्रधान मोदींचे कवच…गुन्हेगार खासदार बृजभूषणला महिला कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी महिला काँग्रेसचे मुंबईत आंदोलन

कुस्ती फेडरशेनचे अध्यक्ष व भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यात आले असताना मोदी सरकार मात्र बृजभूषण शरण यांना वाचवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कवच या महिला कुस्तीपटुंसाठी नसून स्वतःच्या पक्षाच्या गुन्हेगार खासदार बृजभूषणला वाचवण्यासाठी …

Read More »