Breaking News

Tag Archives: delhi

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी तरूण अतिशी विराजमान तिसरी महिला मुख्यमंत्री म्हणून घेतला शपथविधी

तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या मंत्री आणि केजरीवाल यांच्या सहकारी आतिशी यांची मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचविले. त्यानुसार आतिशी यांचा आज मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सर्वात तरूण वयात आतिषी यांच्यावर आम आदमी पार्टीने सोपविली …

Read More »

महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २९ जुलैला दिल्लीत महिला काँग्रेसचे आंदोलन महिला आरक्षण, महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर आंदोलन

महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अंमलबाजवणी, प्रचंड वाढलेली महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. महिलांचे हे तीन ज्वलंत प्रश्न घेऊन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत २९ जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने भाग घेणार …

Read More »

दिल्ली-मुंबईतील घरांच्या किंमतीत ५० टक्के वाढ अॅनारॉक च्या अहवालात नवी माहिती पुढे

रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) मधील सरासरी घरांच्या किमती गेल्या पाच वर्षांत घरांची मागणी वाढल्याने किंमतीत जवळपास ५०% वाढ झाली आहे. अॅनारॉक Anarock च्या अहवालात असे दिसून आले आहे की दिल्ली-NCR मधील निवासी मालमत्तेची सरासरी किंमत जानेवारी-जून २०२४ मध्ये ४९% वाढून ६,८०० रुपये प्रति …

Read More »

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती ट्रायल कोर्टाचा आदेश लिखित स्वरूपात येण्याआधीच ईडी उच्च न्यायालयात

काल रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना साऊथ अव्हे्न्यु न्यायालयाने जामिन मंजूर करत हा जामीन ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर नसून सर्वसाधारण गुन्हेगारांना देण्यात येणाऱ्या जामीनच्या अधिकारात हा जामीन मंजूर करण्यात येत असल्याचा निकाल दिला. त्यास २४ तास होण्यापूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने २१ जून रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर …

Read More »

दिल्ली आणि चेन्नईच्या तुलनेत मुंबई शहरात राहणे सर्वाधिक महाग एचआर कन्सल्टन्सी मर्सरचा रिपोर्ट

एचआर कन्सल्टन्सी मर्सरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारताची आर्थिक राजधानी मुंबई अजूनही प्रवासींसाठी देशातील सर्वात महागडे शहर आहे. मर्सरच्या २०२४ च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेनुसार, वैयक्तिक काळजी, ऊर्जा आणि उपयुक्तता, वाहतूक आणि घरभाडे या बाबतीत मुंबई विशेषतः महाग आहे. जागतिक स्तरावर हाँगकाँगने सर्वात महागडे शहर म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. हिंदी …

Read More »

लेखिका अरूंधती रॉय यांच्यावर युएपीए अंतर्गत खटल्यास राज्यपालांची मंजूरी राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिली मान्यता

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी कादंबरीकार अरुंधती रॉय आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय कायद्याचे माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन यांच्यावर १४ जून रोजी युएपीए UAPA च्या कलम १३ अंतर्गत २०१० मध्ये एका कार्यक्रमात केलेल्या कथित वक्तव्याबद्दल खटला चालवण्यास मंजुरी दिली, असे राजभवनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. अरूंधती रॉय आणि …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे हिमाचल प्रदेशला आदेश, दिल्लीला पाणी द्या ५० अंश सेल्सियस पेक्षा जास्त गर्मी

सर्वोच्च न्यायालयाने ६ जून रोजी दिल्लीतील पिण्याच्या पाण्याचे संकट कमी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातून १३७ क्युसेक अतिरिक्त पाणी हरियाणातील हथनीकुंड बॅरेजमधून वजिराबाद बॅरेजमध्ये सोडण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि के व्ही विश्वनाथन यांच्या सुट्टीतील खंडपीठाने केंद्रासह दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश राज्यांसह अप्पर यमुना नदी मंडळाने घेतलेल्या बैठकीच्या इतिवृत्तांचा …

Read More »

अरविंद केजरीवाल जाता जाता म्हणाले, सर्व एक्झिट पोल बनावट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज तिहार तुरुंगात आत्मसर्मपण

दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जामीन मंजूर केला होता. तसेच २ जूनला तिहार तुरूंगात आत्मसमर्पण करण्याची अट जामीन देताना घातल होती. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरूंगात जाण्यासाठी घरातून दुपारी निघाले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, …

Read More »

दिल्लीतील रूग्णालयाला लागलेल्या आगीत सात नवजात शिशूंचा मृत्यूः दोघांना अटक रूग्णालय रजिस्टर नसल्याची माहिती पुढे

दिल्ली पोलिसांनी रविवारी न्यू बॉर्न बेबी केअर रूग्णालयाच्या  मालकाला आणि डॉक्टरला अटक केली.  रूग्णालयात रात्री उशीराने मोठ्या प्रमाणात आग लागल्याने सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलचे मालक डॉ नवीन खिची यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. याशिवाय, घटनेच्या वेळी रुग्णालयाच्या शिफ्टवर रूजू …

Read More »

स्वाती मालीवाल प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सहाय्यकावर विनयभंगाची तक्रार केली. त्यानंतर स्वाती मालीवाल यांनी केलेल्या आरोपावर अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी सांगितले की, त्यांना पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर त्यांचे सहकारी बिभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्याची …

Read More »