मुख्यमंत्री स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवतात मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शेतकऱ्याच्या मुलासारखं उत्तर दिले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लागतील अशी अपेक्षा होती. संत्रा, धान, कापूस, सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला नाही. १९४ तालुक्यांना केंद्राकडून मदत मिळेल अशी अपेक्षा होती, पण तिथेही अपेक्षाभंग झाला आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या मदतीपासून …
Read More »अजित पवार यांचे सारथीच्या फेलोशिप संदर्भात मोठे वक्तव्य
राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे. मुळात यासाठी १३८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सरकारने जाहिरात काढताना विद्यार्थ्यांच्या मर्यादा संख्येचा त्यात उल्लेख नव्हता. त्यामुळे २०२३ च्या बॅचमधील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन
दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करतात, परिणामी महाराष्ट्रातल्या दुधाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते आणि परराज्यातल्या खाजगी दूध संस्थांची चंगळ होते असा गंभीर …
Read More »अजित पवार यांची घोषणा, १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणार
महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. या संदर्भांत नागपूर विधानभवन येथे बैठक झाली. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा सवाल,… अजित पवार यांना ती पदे देणे हे अनधिकृत होते का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती अनाधिकृत असल्याचं अजित पवार यांच्या वतीने बोलण्यात येत आहे. जर असं असेल तर उपमुख्यमंत्री पदापासून तर विरोधी पक्षनेते पदापर्यंत अजित पवार यांची नियुक्ती करण्याचे पत्र जयंत पाटील यांनी दिले होते. तर हे देखील अनधिकृत होते का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस …
Read More »धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या
पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती देण्यात यावी. त्या अनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रुंदी’ साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला आज दिले. …
Read More »अजित पवार यांचे आदेश, चाकण हद्दवाढीचा आणि तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा…
राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. या …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही…
प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी दिले. यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण आयुक्त सूरज …
Read More »आता या एकाच यंत्रणेचे दोन विभाग कराः अजित पवार यांचे आदेश वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन आणि वैद्यकीय आरोग्य यंत्रणा असे दोन स्वतंत्र विभाग करण्याच्या कार्यवाहीचे निर्देश
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन आणि वैद्यकीय आरोग्य यंत्रणा असे दोन स्वतंत्र विभाग कार्यरत असणे गरजेचे आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक उपाययोजना करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या …
Read More »दिवाळी सुट्टीचा असर मंत्र्याच्या मनावरून उतरेना, मंत्रिमंडळ बैठकीचेही भान राहिना
वास्तविक पाहता दिवाळीचा सण मागील आठवड्यात सुरु झाला. तो या आठवड्याच्या मध्यापर्यंत होता. मात्र आगामी निवडणूकीची धाकधुक हृदयात ठेवत अनेक सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी मतदारसंघातच ठाण मांडले. त्यातच राज्यात मराठा विरूध्द ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या झालेल्या बैठकीला तब्बल १६ मंत्र्यानी दांडी मारल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. …
Read More »
Marathi e-Batmya