Tag Archives: devendra fadanvis

फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे सत्यात कधी येईल किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही - जयंत पाटील

शिर्डी: प्रतिनिधी किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचे “मी पुन्हा येईन” हे सत्यात कधी येणार असा सवाल करत याची माहिती आता माध्यमांनीच द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील केले. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी राज्यातील भाजपा नेत्यांनो, मोदींची भेट घ्या राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीने व पूराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी त्याला मोठ्या आधाराची गरज आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत करावीच त्याचबरोबरच केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील …

Read More »

बदली तर झाली पण महिना झाला तरी अधिकाऱ्यांना मंत्रालयात पोस्टींग मिळेना पोस्टींग मिळेना म्हणून अधिकारी जून्याच विभागात कार्यरत

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीमुळे  आणि कालावधी पूर्ण झाल्याने बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या बदल्या करताना सामान्य प्रशासन विभागाने पर्यायी अधिकाऱ्याची वाट न पाहता बदली झालेल्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे सक्त आदेश बजावत बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रूजू करावे असे स्पष्ट निर्देश दिलेले …

Read More »

निवडणूक आयोगाने कळवले मविआ सरकारला, “विनंती स्विकारू शकत नाही” सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तरच निवडणूक थांबविणार

मुंबई : प्रतिनिधी ओबीसींचे राजकिय आरक्षण वाचविण्यासाठी म्हणून राज्य सरकारने सुधारीत अध्यादेश काढण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी घेतली. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त ओबीसींच्या जागांच्या निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे केली. परंतु या नव्या अध्यादेशानुसार निवडणूका घेण्यास असमर्थता दर्शवित महाविकास आघाडीची विनंती राज्य निवडणूक …

Read More »

महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्येच आघाडीवर फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ ठरले-सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी महिला अत्याचारांमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे आत्ताच घोषित झालेल्या NCRB २०२० च्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. तर मविआ सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपाच्या राज्यांतील महिला अत्याचारांवरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला तेथील महिलांचीही …

Read More »

दिल्लीत मुजरा करू देत नसल्याने सोमय्यांचा गल्लीत गोंधळ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी दिल्लीतील नेते मुजरा करू देत नाहीत म्हणून किरीट सोमय्या यांचा गल्लीत गोंधळ सुरु आहे. केवळ स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी त्यांची जी काही नौटंकी सुरु आहे त्याला मनोरंजनात्क मुल्य आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत जर महाराष्ट्राचे यामुळे मनोरंजन होत असेल तर ते कोण कशाला थांबवेल अशी …

Read More »

या कारणामुळे फडणवीस आणि मंत्री पाटील यांचा एकाच वाहनाने प्रवास काल नंदूरबार मधील कार्यक्रमासाठी दोघांनी केला होता एकत्र प्रवास

नंदूरबार-मुंबई: प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी ठरतील असे सूचक वक्तव्य करत राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यातच लगेच दुसऱ्या दिवशी नंदूरबार मधील एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या “भावी सहकारी” आणि “डाव्हर्जन” वर मुख्यमंत्र्यांसह कोण काय म्हणाले ? भाजपा मंत्र्याकडे पाहून मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

औरंगाबाद: प्रतिनिधी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरवातीलाच आपल्या भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व आजी-माजी आणि भावी सहकाऱी असा उल्लेख करत राजकिय वर्तुळात उत्सुकता वाढवत दुसऱ्याच क्षणाला म्हणाले की मला रेल्वे फार आवडते, रेल्वेचे एक बराय त्याला रूळ असतात, त्यामुळे ती इकडे-तिकडे जावू शकत नाही. …

Read More »

ओबीसी आरक्षणप्रश्नी ही तर भाजपाची नौटंकी, पाप झाकता येणार नाही मोदी व फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी त्यांच्याविरोधात आंदोलन करावे-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील भारतीय जनता पक्ष करत असलेले आंदोलन ही नौटंकी आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्राच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. आंदोलनाची नौटंकी …

Read More »

फडणवीसबरोबरील आयपीएस अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला. ते सह्याद्री अतिथीगृहात  आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दिल्ली येथे आयपीएस व मुंबई येथेही …

Read More »