Breaking News

Tag Archives: devendra fadnavis

खडसेंनी व्यक्त केली नाराजी फायदा झाला पंकजा मुंडे गटाला डमी उमेदवाराचे रमेश कराड झाले आमदार

मुंबई: विशेष प्रतिनिधी सत्तेत असताना खोट्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला आणि विधानसभे पाठोपाठ परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांविरोधात टिकेची तोफ डागली. मात्र त्यांच्या तोफ डागण्यामुळे पंकजा मुंडे यांच्या गटाचे रमेश कराड यांच्या गळ्यात अचानक अधिकृत उमेदवारीची माळ पडून ते बिनविरोध निवडूण आले. त्यामुळे …

Read More »

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घडवून आणली सर्वपक्षिय एकजूट विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करूत असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता ,आता मे अखेरपर्यंत आपणास ही …

Read More »

चक्क विरोधी पक्षनेते फडणवीसांना एनकांऊटरच्या धमक्या भाजपाकडून राज्यभरातल्या आयुक्तांना निवेदन

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात गेले काही दिवस कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असुन यासंबंधीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. गेले काही दिवस राज्यांत माध्यमांची गळचेपी होत असून, समाज माध्यमांवर सरकार विरोधात व्यक्त होणाऱ्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्याचे …

Read More »

फडणवीस सरकारने केली महाराष्ट्राची घोर फसवणूक! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात राज्याला पुढे आणण्याचा अट्टाहास लपून राहिलेला नाही. देशाचे पंतप्रधान सर्व राज्यांकडे समदृष्टीने पाहत नाहीत हे स्पष्ट आहे. परंतु गुजरातचे महत्त्व वाढण्याकरीता महाराष्ट्राच्या हितांना मुठमाती देण्याइतपत तत्कालीन फडणवीस सरकारची मजल जाईल असे कधीच वाटले नव्हते. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत प्रस्तावित असताना ते गुजरातला …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंकडून गडकरींना धन्यवाद देत बाकीच्यांना लगावला टोला ३ मे नंतर लॉकडाऊनबाबत परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या संकटकाळात पक्षबाजूला ठेवून राज्य सरकारसोबत या संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींजी आपण केलात. या आवाहनाबद्दल तुमचे खरेच धन्यवाद. मात्र अशा संकटसमयीही इतर जे कोणी घाणेरडे राजकारण करत आहेत, त्यांना यामुळे काही काळ तरी वेळेचे भान येईल अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपा नेत्याकडून राज्यात …

Read More »

फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या हाती पैसा देण्यासाठी या गोष्टी करा कापूस, तूर, चणा खरेदी केंद्रे सर्वत्र सुरू करण्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी अतिशय तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र आज …

Read More »

काँग्रेसकडून पालघरप्रकरणातील भाजपा कार्यकर्त्यांचे कनेक्शन उघड प्रवक्ते सचिन सावंत यांनी फोडले बिंग

मुंबई: प्रतिनिधी पालघरमधील ज्या गडचिंचले गावात तिघांच्या हत्येची दुर्दैवी घटना घडली. त्या ग्रामपंचायतीवर १० वर्षांपासून भाजपाची सत्ता असून चित्रा चौधरी ह्या सध्या तिथल्या सरपंच आहेत. या घटनेत भाजपाचे स्थानिक बुथ कार्यकर्त्ये असून त्यांच्या नावाची अधिकृत यादी भाजपाने त्यांच्या पक्षाच्या डहाणू फेसबुकवर घोषित केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली ५३ हजार किट्सची मदत संघटनांच्या प्रतिनिधींकडे केली मदतसामुग्रीचे वितरण

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट बसेसचे चालक आणि वाहक तसेच सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांसाठी मदत सामुग्री- किट्स विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या-त्या क्षेत्रातील संघटनांकडे सुपूर्द करण्यात आले. मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक आणि फेरीवाले, विक्रेते यांच्यासाठी अन्नधान्याच्या ३० हजार किट्स कामगार नेते शशांक राव यांच्याकडे सुपुर्द केल्या. एका परिवाराला लागणारा तांदूळ, गहू पीठ, डाळ, खाद्यतेल, साखर, चहा पावडर आणि …

Read More »

मोफत तांदुळ वाटप सुरू अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त मोफत तांदूळ ३ एप्रिलपासून टप्या-टप्याने  देण्यात येत आहे. या योजनेसाठी ३ लाख ५० हजार ०८२ मे.टन तांदूळ भारतीय …

Read More »

कंपनी, दुकान मालकांनो कर्मचाऱ्यांचे पगार कापाल तर तुरूंगात जाल राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. याकालावधीत अनेक कामगारांना घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे या कालावधीतील कंपन्यांमध्ये असलेले कंत्राटी कर्मचारी, विस्थापित-बेघर कर्मचारी, आऊटसोर्सिंग करण्यात आलेल्या कर्मचाऱी आणि खाजगी दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापल्यास संबधित मालक, कंपनीच्या प्रमुखावर कायदेशीर कारवाई करून एक ते दोन वर्षाची …

Read More »