Tag Archives: devendra fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका ‘गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परत

काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी ‘गरुड दृष्टी’ हे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर पोलीस विभागाच्या वतीने …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मोहन मते, कृष्णा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी घेतली बहिणींच्या रक्षणाची शपथ महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये 'बचत गट मॉल्स'

महिला सक्षमीकरण हा कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा कणा असतो. ज्यावेळी समाजातील महिला मुख्य प्रवाहात येतील तेव्हाच त्या राष्ट्रांच्या विकासाला गती येते. महिलांना अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवल्याने देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. महिलांच्या ५० टक्के सहभागाशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य नाही, असे सांगून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘बचत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल, शरद पवार यांना राहुल गांधी यांची आठवण कशी? शरद पवार यांच्या दाव्यावर सलिम-जावेदची स्टोरी असल्याची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अॅटम बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा करत लोकसभा आणि महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूकीत मतचोरी भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केला असल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या आधी दोन व्यक्ती भेटायला आल्याचे आणि १६० जागा …

Read More »

शरद पवार यांचा गौप्यस्फोट, विधानसभेच्या आधी आम्हाला दोघे भेटले… उद्धव ठाकरे यांच्या बसण्याच्या जागेचा विषय टीकेचा होऊ शकतो का?

नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवळपास सहा महिन्यापासून कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास करून मतचोरीचा भांडाफोड केला. त्यानंतर काल इंडिया आघाडीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूीच्या आधी दोन व्यक्ती आपणास आणि राहुल गांधी यांना आणि मला भेटले. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पुण्यासाठी आणखी ५ नवीन पोलीस स्टेशन देणार पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन

पोलिसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेवून ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरेन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी पूर्व नियोजन महत्वाचे पायाभूत सुविधा विकास प्रकल्प कार्यशाळेचे उद्घाटन

पूर्व नियोजन, कालमर्यादा, पारदर्शकता, गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करून सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, ‘चिप मिनिस्टर’ फडणवीस निवडणूक आयोगाचे दलाल की वकील? मतचोरीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन..

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतचोरी कशी केली, हे पुराव्यासह मांडून देशात एकच खळबळ उडवून दिली. राहुल गांधींच्या धमाक्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार …

Read More »

बेस्ट महाव्यवस्थापकांच्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडून नेमलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा गोंधळ आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारावरून निर्माण झालेला गोंधळ बुधवारी दूर झाला. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये आयएएस अधिकारी आशिष शर्मा यांच्या नियुक्तीचा आदेश …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, दावोसनंतरच्या १५ लाख ९८ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या त्या कुठंयत ? ट्रिपल इंजिन सरकार नोकऱ्या देण्यात फेल

२०१५ पासून प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत, महाराष्ट्र प्रशिक्षण देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण नोकरी देण्यात ११व्या क्रमांकावर आहे. १३ लाख ३१ हजार लोकांना प्रशिक्षण दिले पण त्यातील फक्त ८० हजार लोकांना नोकरी देण्यात यश आले. म्हणजे १०% बेरोजगारांनाही हे सरकार नोकरी देऊ शकले नाही हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे …

Read More »