Tag Archives: devendra fadnavis

नाना पटोले यांची मागणी, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला तंबी द्या मटनाच्या दुकानांना सर्टिफिकेट देण्याचा मंत्र्याचा नवा धंदा आहे का? त्यांना कोणी अधिकार दिला?

कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे …

Read More »

भोंग्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा, सरसकट परवानगी नाही एमपीसीबीला कारवाई, पोलिस निरिक्षकावर प्रमुख जबाबदारी, उल्लंघन करणाऱ्यांस पुन्हा परवानगी नाही

राज्यातील मंदीर मस्जिदीवरील भोंग्याच्या माध्यमातून ध्वनी प्रदुषणाबाबतचा मुद्दा भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी यासंदर्भातील प्रश्न लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता मंदिर आणि मस्जिदीवरील भोंग्याच्या ध्वनी प्रदुषण होत आहे. त्यामुळे यापुढे किमान पातळी ४५ डेसिबल आणि ५५ डेसिबल या मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प; सर्वसामान्य लोकांची थट्टा गाडीतून फिरणाऱ्यांसाठी असंख्य पूल पण एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडे दुर्लक्ष

आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा केल्या आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राची …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, आयआयएम नागपूरची नेट झिरो कडे वाटचाल २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के अपारंपरिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मिती

भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात आयआयएम नागपूरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे या संस्थेसाठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्ष २०३० पर्यंत राज्यात एकूण ऊर्जा निर्मितीपैकी ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते ‘पतंजली फुड व हर्बल पार्क’चे उद्घाटन या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल

पतंजली फुड व हर्बल पार्कच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेत जाणार आहे. संत्र्याची ग्रेडींग, साठवणही येथे होणार असून हा प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून पतंजली व राज्यशासन संयुक्तपणे …

Read More »

उद्योग प्रकल्पासाठी आलेल्या रामदेव बाबा यांचे वक्तव्य, औरंगजेब आणि त्याचं घराणं लुटारू… नागपूरात पतंजली फूड आणि हार्बल प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी रामदेव बाबा यांचे वक्तव्य

छावा चित्रपट आल्यापासून राज्यात औरंगजेब यांच्यावरील चर्चेला राज्यात जोर आला आहे. त्यातच समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असे सांगितल्याने त्यांच्यावर अर्थसंकल्पिय अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली. आता त्यात नागपूर येथील मिहान औद्योगिक क्षेत्रात पतंजली फूड …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साधला संवाद

महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – राज्यपाल

केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय समारोप व कन्यारत्न यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, सेकंड टू नन’ नसलेल्या महाराष्ट्राला उत्तम राज्य बनवू नार-पार-गिरणा व नळगंगा ते वैनगंगा नदी जोड प्रकल्प

महाराष्ट्र हे देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग व्यवसायापासून ते शेती, सेवा क्षेत्र व आरोग्य सुविधा यामध्ये राज्य अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचा विकास देशात सर्वाधिक महाराष्ट्रमध्येच आहे. कुठल्याही क्षेत्रात सेकंड टू नन ‘ नसलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनविण्याची ग्वाही देत विरोधकांनी राज्यकारभारासाठी आपल्याकडील चांगल्या सूचना देण्याची अपेक्षाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, नाना पटोले जंयत पाटील यांना टोला प्रत्येक कामाला स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे आहे का

राज्यातील महायुती सरकारमधील आलबेल संबधावरून प्रसारमाध्यमातून दररोज काही ना काही वृत्त बाहेर येत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मधुर संबधाच्या बातम्याही बाहेर येत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व चर्चांना उत्तर देत विरोधकांसह प्रसार माध्यमातील चर्चांनाही पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. …

Read More »