मागील महिन्यापासून मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्षाची भूमिका स्विकारली. मात्र त्यांच्या आक्रमक भूमिकेचा सर्वाधिक फटका हिंदू धर्मियांच्या मंदिरांना आणि कार्यक्रमांना बसला. तरीही मनसे कडून मस्जिदींवरील भोंग्यावरून अद्यापही आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरेंवर पुन्हा एकदा …
Read More »अजित पवार म्हणाले राज ठाकरेंना, अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या हुकूमशाही चालणार नाही, अल्टीमेटम कुणी द्यायचा नाही
अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या… कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अल्टिमेटमची भाषा …
Read More »अजित पवार म्हणाले, …विरोधात प्रचारसभा घेणाऱ्यांनी उलटी प्लेट लावली मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली टीका
मागील दोन वर्षे करोना महामारीचे संकट सोसल्यानंतर त्यातून बाहेर पडत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं असताना काहीजण अचानकपणे भोंग्याचे राजकारण करून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या विरोधात राज्यभर प्रचारसभा घेणाऱ्यांनी आता उलटी प्लेट …
Read More »गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार म्हणाले, संपूर्ण सरकार… कटेझरी येथील पोलीस इमारतीचे लोकार्पण;शौर्य स्थळाला भेट व सी-६० जवानांचा केला सन्मान
गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृहविभाग, अर्थ विभाग आहेच. परंतु संपूर्ण कॅबिनेट, संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे …
Read More »मोदींच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, जेवढा कर जातो त्या तुलनेत…. पण सर्वात आधी केंद्राचा कर नंतर राज्यांचा कर
पेट्रोल-डिझेलवर महाराष्ट्रात असलेल्या व्हॅट टॅक्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर आरोप करत राज्यातील महागाई वाढीस महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले. त्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर देत थकीत जीएसटीच्या रकमेवरून निशाणा साधला. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी …
Read More »आणि शरद पवारांनी सांगितला खातं बदलून घेण्याचा किस्सा अजित पवारांना झोप काही लागणार नाही
विक्रम काळेंनी मला फोन करुन सांगितलं की आम्हाला १५ मिनिटं द्या. आम्हाला जी पुस्तकं वाटायची आहेत त्या कार्यक्रमाची सुरुवात करुन फक्त जा. मी घड्याळ बघतोय. विक्रम काळे हे शिक्षकांचे प्रतिनिधीचं गणित इतकं कच्चं असेल याचं उदाहरण आता पाहायला मिळालं. १५ मिनिटं झाली आणि आपण जवळपास एक तासावर आलाय असा मिश्किल …
Read More »अजित पवार म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते हे लक्षात घ्या तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, सर्वांना समान संधी
महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते, हे लक्षात घेऊन राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री …
Read More »कोळशाच्या संकटावर अजित पवार म्हणाले, तर छत्तीसगड मध्ये खाणच विकत घेवू वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या कामाची दिली माहिती
मागील काही दिवसांपासून कोळशाचा अपुरा पुरवठा आणि खाजगी वीज कंपन्यांकडून कमी प्रमाणात होत असलेला वीज पुरवठा या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असून याचाच भाग म्हणून छत्तीसगडमधील खाण घेण्याची तयारी सुरु आहे. तसेच परदेशातून देखील …
Read More »वाईन शॉपवाल्यांसाठी खुषखबरः विदेशी मद्याच्या विक्री परवान्यांसाठी आता नवीन दोन श्रेणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यात सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते. यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या एफ.एल.-2 परवान्यांचे क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करुन विद्यमान परवानाधारकांना त्यांच्याकडील परवान्याची श्रेणीवाढ करण्यास …
Read More »काजूबोंडे, मोहाफुलेसह आता फळे आणि फुलांपासून तयार होणारे मद्य विदेशी वर्गात फळे, फुलांपासून मद्यार्क निर्मितीच्या धोरणास मान्यता
काजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी “देशी मद्य” याऐवजी “विदेशी मद्य” अशी करुन या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे “स्थानिक मद्य” निर्मितीच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते. काजूबोंडे व मोहाफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणा-या मद्याचे वर्गीकरण हे २००५ पासून “देशी मद्य” असे …
Read More »
Marathi e-Batmya