Breaking News

Tag Archives: eknath shinde

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी एमसीएचआय - क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एमसीएचआय – क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन …

Read More »

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित परदेशी शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केली ही मागणी एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत

‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजनेतील ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी दुर कराव्यात तसेच त्या विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. सुप्रिया …

Read More »

महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आता अंबानी-अदानीसह या उद्योजकांच्या सल्लानुसार होणार महाराष्ट्रही आता उद्योजकांच्या घशात- राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर नियुक्ती

साधारणतः अडीच वर्षापूर्वी भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर करताना त्यावेळचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनची बनविणार असल्याची घोषणा विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यानंतर त्यादृष्टीने कोणतीच कारवाई झाली नाही. मात्र आता हिंडेनबर्ग रिसर्च संस्थने जाहिर केलेल्या अहवालामुळे अदानी ग्रुप यांच्या व्यावसायिक विश्वासहार्तेवर प्रश्नचिन्ह …

Read More »

भाग ३: मेट्रो-६ घोटाळ्याप्रकरणी फडणवीसांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश एमएमआरडीए आयुक्तांना पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे दिले निर्देश

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होवून सात महिने झाले. या सात महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो-६ प्रकल्पातील बोगस प्रकल्पबाधितांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला. मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा घोटाळ्याकडे पहायला लागला वेळ नसल्याने अखेर मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेतील घोटाळ्यातील सहभागींवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल …

Read More »

अजित पवार म्हणाले, काहीही जण सकाळी सकाळी टाकतात तर मी कामाला सुरुवात करतो पवारांचा रोख मनसे प्रमुख राज ठाकरेंकडे तर नाही ना चर्चेला सुरुवात

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, राज्यात न आलेले प्रकल्प आणि सुरू असलेल्या प्रकल्पांवरील स्थगितीवरून राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात नवं सरकार स्थापन होऊन ६ महिने झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार …

Read More »

पुणे जिल्ह्यातील पोट निवडणूकीवरून अजित पवार म्हणाले, बिनविरोध होण्याचे कारण काय? पंढरपूर, कोल्हापूर, नांदेड येथील निवडणूक बिनविरोध झाली नव्हती

राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही उतरण्याची तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतानाच आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला आवाहन …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेची घोषणा, कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार भराडी देवीच्या यात्रेला पहिल्यांदाच गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

“आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज घेतले. …

Read More »

आदित्य ठाकरेंची खोचक टीका, अर्थसंकल्प पालिकेचा की वर्षावरील कंत्राटदारांचा हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण कोणतीही करवाढ नसणारा आणि शिलकी अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावरून शिवसेनेचे आमदार आदिय ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि आयुक्तांवर टीका केली. तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी बनवलेला …

Read More »

जाणून घ्या पालिकेने काय दिले अर्थसंकल्पातून मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार करवाढ न करता मात्र शिक्षणावरील खर्चात कपात करत मुंबईकरांसाठी अर्थसंकल्प

मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांची मुदत संपलेली आली असून साधारणतः एप्रिल-मे दरम्यान या निवडणूका कधीही जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी कोणत्याही पध्दतीची दरवाढ नको मात्र त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काही नव्या बाबींची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली. त्यानुसार आज …

Read More »

भाग-१: मुख्यमंत्री शिंदेच्या अध्यक्षतेखालील सरकारी संस्थेचा सर्वसामान्यांच्या नावावर सदनिका घोटाळा सॅटेलाईट सर्व्हेमध्ये नसलेले प्रकल्पबाधित दाखवित १३५ बोगस बाधितांना दलालांच्या मध्यस्थीने सदनिका वाटप

राज्यात भाजपाच्या मदतीने जनतेच्या मनातील सरकार आणि सर्वसामान्यांचे सरकार असल्याची घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र मागील ८ वर्षापासून नगरविकास विभागाचा कारभार सांभाळणारे आणि मागील ७ महिन्यापासून राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्प-६ मधील प्रकल्पबाधितांच्या नावाखाली सर्वसामान्याच्या नावाखाली …

Read More »