मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे असा टोला भाजपाला लगावत हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. …
Read More »गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी घेतलेल्या निर्णयावर पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंचे ओव्हर रूल झोपडपट्टी पुनर्वसनातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश
मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांचे काम एसआरए हाती घेईल आणि ते प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा साधापणत: तीन आठवड्यांपूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यास आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ओव्हर रूल केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. साधारणत: तीन आठवड्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र …
Read More »ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वांचेच एकमत: अंतिम निर्णय येत्या ७ दिवसानंतर प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक
मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या …
Read More »पूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरा
मुंबई : प्रतिनिधी ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करत नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात …
Read More »महानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय- यासह आणखी महत्वाचे निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील क व ड वर्ग महापालिका तसेच नगरपंचायती व नगर परिषदा यामधील कोविड कर्तव्य पार पाडतांना मरण पावलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. अ आणि ब वर्ग महानगरपालिका वगळता इतर …
Read More »मुख्यमंत्र्यांचे आवाहन, वाढदिवस सेलिब्रेशन नको पण मुख्यमंत्री सहायत्ता निधीत योगदान द्या राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा …
Read More »दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा आधार, “तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करणार असल्याची दिली ग्वाही
महाड (तळीये) : प्रतिनिधी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या तळीये गावावर काल अतिवृष्टीने दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० जणांना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. काल संध्याकाळपर्यंत जवळपास ३७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्यांखालून काढण्यात आले. त्यात आज आणखी वाढ होवून ही संख्या ४० वर पोहोचली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज येथे आले. …
Read More »संपूर्ण शहराचा पुनर्विकास करणारे ठाणे शहर हे देशातील पहिले शहर ठरणार क्लस्टर पु्र्नविकासाच्या यशस्वी अंमलबजावणीने वाटचाल शाश्वत विकासाकडे
क्लस्टरचा रिडेव्हलेपमेंट अर्थात समुह पुर्नविकासाचे धोरण ठाणेकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. समुह पुर्नविकासासंतर्गत जुन्या मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींचा एकत्रितरित्या पुर्नविकास करणे सहजशक्य होणार आहे. अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना चांगले हक्काचे घर मिळणे हा त्यांचा हक्क असून ठाणेकरांच्या जीविताशी निगडित असल्याने त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न क्लस्टरच्या माध्यमातून सोडविण्याचे उत्तरदायित्व राज्य शासनाने आणि राज्याच्या …
Read More »दररोज १५ लाख लोकांना लस देण्याची तयारी नागरिकांच्या आरोग्याच्या हित जपले जाईल कोणतीही उणीव भासू देणार नाही- मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. …
Read More »अखेर आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नाला यश नगरविकास मंत्र्यांनी दिले आदेश
मुंबई : प्रतिनिधी पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याची अचानक कारवाई अचानक आज सकाळपासून सुरु करण्यात आली. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. याप्रश्नी अखेर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तातडीने बैठक घ्यायला लावून …
Read More »
Marathi e-Batmya