Breaking News

Tag Archives: farmer

तीन वर्षातील ४४८ शेतकरी पुरस्काराने सरकारकडून सन्मानित होणार रविवारी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन

राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक …

Read More »

देशाची नैसर्गिक शेतीकडे वेगाने वाटचाल

देशातील शेतकरी बंधू-भगिनींना सबळ बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. याच अनुषंगाने, दिल्लीत पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या हवामानानुरुप आणि भरघोस पीक देणाऱ्या वाणांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत आज पिकांच्या 109 नवीन वाणांचे उद्घाटन …

Read More »

धनंजय मुंडे यांचे आदेश, जून अखेरपर्यंत ७५ टक्के पीक कर्ज वाटप करा खते, बियाणे वाढीव दराने विकणाऱ्यांवर कडक कारवाई

राज्यात बी बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, खतांची अतिरिक्त मागणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल. बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच जून अखेरपर्यंत ७५ टक्के पीक कर्जाचे वितरण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कृषिमंत्री …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, दाभाडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा दाभाडे कुटुंबियांची विजय वडेट्टीवार यांनी घेतली भेट

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा या गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे बँक पैसे देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली …

Read More »

शेतकरी बांधवांची दिवाळी गोड, लवकर मिळणार सरकारच्या या योजनेचा लाभ.. केंद्राच्या या योजनेचा लवकरच मिळणार शेतकऱ्यांना लाभ

शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळतो. राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात. यातील एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा १५ वा हप्ता लवकरच मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना …

Read More »

झेंडूच्या फुलांनी दसरा गोड होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले दिवाळीला झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा

झेंडूच्या उत्पादनाने दसरा, दिवाळी सुखात जाईल, या आशेवर शेतकऱ्यांनी दुष्काळात थोड्याफार उपलब्ध पाण्यावर फूलशेती जगवली होती. मात्र, फुलांना मिळत असलेल्या कवडीमोल भावाने उत्पादन खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे.दसऱ्यात झेंडूच्या फुलांना २० ते ३० रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. जर हाच भाव कायम राहिला तर दिवाळी गोड …

Read More »

शेतकऱ्यांना केंद्र सरकारची दिवाळी भेट, खतांवरील अनुदान सुरूच राहणार शेतकऱ्यांना जुन्या दराने १३५० रुपये प्रति पोती डीएपी मिळणार

  शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. शासनाने रब्बी हंगामासाठी खतांवरील अनुदान मंजूर केले आहे. याचा फायदा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर २२,३०३ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ आणि CCEA च्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. …

Read More »

रविवारपासून शरद पवार या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वात नुकसान झालेल्या उस्मानाबाद, औसा, तुळजापूर,परांडा येथील गावांना भेटी देणार

मुंबई : प्रतिनिधी गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून हवालदिल झालेल्या बळीराजाला मायेचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून दोन दिवसाच्या दौर्‍यावर आहेत. दरम्यान या दौऱ्यात शरद पवार शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जावून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. रविवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी …

Read More »

दे–ही शेतकरी… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारित काल्पनिक कथा

कल्पेशने पुन्हा एकदा पेटी उघडली, प्लास्टिकच्या पिशवीत दोन तुकडे झालेलं पासबुक बघितलं. काहीसा विचार केला पुन्हां पासबुक पाहून तसंच पेटीत ठेवलं. रडणाऱ्या पोरीला शांत पाळण्यात झोपवलं आणि उठून शेतावर निघाला. चालताना रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत राहिला, “बँकेत जाणार हायस का रं? ” कोणी हो बोलें पण कामं असल्यामुळे कल्पेश बँकेतलं त्याचं काम सांगण्या आधीच …

Read More »