प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी …
Read More »आता पंतप्रधान मोदी यांची ग्रामीण भागासाठी नव्या घरांची योजना आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुतोवाच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत ३ कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी मदत करण्यास मंजुरी दिली आहे. मोदी ३.० ची ही दुसरी मोठी चाल आहे. त्यांच्या पहिल्या फाईल मंजुरीमध्ये, पंतप्रधानांनी पीएम किसान निधी निधीचा १७ वा हप्ता जारी करण्यास अधिकृत केले, ज्याची …
Read More »अजित पवार यांचे आवाहन, शेतकऱ्यांनो वापसा आल्यानंतरच पेरणी करा पीक कर्ज मिळण्याबाब निर्देश
राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा …
Read More »बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री मग या व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रार करा - कृषीमंत्री धनंजय मुंडे
राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्या विरूद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्यात आला. यासाठी कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याची …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, शेतकरी संकटात मरतोय आणि कृषी मंत्री परदेशात फिरतोय दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर विजय वडेट्टीवार केली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका
राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. असे असताना राज्यातील शेतकरी संकटात मरतोय तर राज्याचे कृषी मंत्री परदेशात फिरतायत अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकारकडून अजून मिळालेली …
Read More »केंद्राच्या कांदा निर्यात परवानगीमुळे शेतकऱ्यामधील रोष कमी नाहीतर वाढला
किमती आणि पुरवठ्याची चिंता लक्षात घेऊन केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याच्या जवळपास सहा महिन्यांनंतर, गेल्या शनिवारी किमान निर्यात किंमत $५५० प्रति टन आणि वर ४०% आकारणीच्या सावधगिरीने त्यांना ‘फ्री’ श्रेणीत परत आणले. १० दिवसांच्या कालावधीत कांदा निर्यातीवरील हा दुसरा महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल आहे. २५ एप्रिल रोजी, गुजरात फलोत्पादन आयुक्तांनी प्रमाणित …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, गुजरातला परवानगी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?
कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता लोकसभा निवडणुका सुरु असताना मोदी सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातला परवानगी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेजारचा महाराष्ट्र का …
Read More »राहुल गांधी यांची घोषणा, इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी
लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांचे …
Read More »आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…
मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा देण्यास सुरुवात केली असल्याने रब्बी हंगामात हाता तोंडाशी आलेले पीक हातचे वाया जाण्याची शक्यता निर्माण होण्याची झाली आहे. त्यातच आज भारतीय हवामान खात्याने इशारा देत आणखी काही दिवस अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. …
Read More »नाना पटोले यांचे आवाहन, …लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज
लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके नागपूरहून पाठवल्याच्या बातम्याही आल्या पण पाच वर्ष झाली अजून या स्फोटामागे कोण होते, …
Read More »
Marathi e-Batmya