Tag Archives: housing project

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत घरकुले मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन …

Read More »

डीएलएफच्या पहिल्या प्रकल्पातील घरांच्या विक्रीची घोषणा २३०० कोटी रूपयांचा महसूल मिळणार

डीएलएफने त्यांच्या मुंबई प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी विक्रीची घोषणा केली आहे, ज्यामुळे २,३०० कोटी रुपयांचा विक्रीपूर्व महसूल निर्माण झाला आहे. ट्रायडंट रिअॅल्टीसोबत भागीदारीद्वारे मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या डीएलएफसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जुलै २०२३ मध्ये, डीएलएफने अंधेरी पश्चिम, मुंबई येथे अंदाजे ३.५ दशलक्ष चौरस फूट क्षेत्र विकसित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा आढावा बीडीडी चाळीच्या सदनिकांचे हस्तांतरणाचे नियोजन

विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगर विकास …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाकडून पर्यावरण विभागाची २०१७ ची अधिसूचना रद्दबातल पर्यावरण विषयक पूर्व-प्रत्यक्ष मंजूरी देण्याची नवी व्यवस्था सुरु केल्याने उल्लंघन

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१६ मे) पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEF&CC) २०१७ च्या अधिसूचनेला रद्दबातल ठरवले आणि बेकायदेशीर ठरवले, ज्यामध्ये काम सुरू झाल्यानंतर प्रकल्पांना पूर्व-प्रत्यक्ष मंजुरी देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांनंतर हा निर्णय देण्यात आला. याव्यतिरिक्त, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने २०२१ च्या कार्यालयीन निवेदनाला …

Read More »

आशिष शेलार यांची ग्वाही, ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार वांद्रे येथील पुनर्वसित रहिवाश्यांना करारपत्रे वितरित

विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम …

Read More »

राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी योजना राबविण्यात येतात. प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी. प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली. गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून …

Read More »

शिवशाही पुर्नवसन कंपनी १० वर्षात फक्त १० हजार घरे, कारभार निवृत्तांच्या हाती तोट्यातील 'शिवशाही' कंपनीचा कारभार निवृत्त अधिकाऱ्यांच्या हाती

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प (एसपीपीएल) कंपनीची घरबांधणीची कामे ठप्प पडली असून, तोट्यात असलेल्या या कंपनीचा प्रशासकीय खर्च आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वार्षिक ३ कोटी रुपये स्वनिधीतून खर्च केले जात आहेत. मात्र, घरबांधणीचे काम बंद असतानाही या कंपनीचा खर्च सुरूच असून १० वर्षात फक्त १० हजार घरे बांधली असल्याची धक्कादायक माहिती गृहनिर्माण विभागातील एका …

Read More »

गिरणी कामगारांना ठाणे जिल्ह्यात म्हाडामार्फत घरांसाठी जमीन उपलब्ध करणार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबई शहरात, उपनगरात जागा उपलब्ध नसल्याने सवलतीच्या दरात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी ठाणे जिल्हयातील ४३.४५ हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या जमिनीपैकी २१.८८ हेक्टर जमीन म्हाडामार्फत गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास सुयोग्य आहे, असा अहवाल नुकताच ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला असल्याची …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, गिरणी कामगारांच्या घराचे प्रश्न सोडवण्याची कालमर्यादा निश्चित करा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे मुंबईचे खरे निर्माते आहे, त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मक रित्या हा प्रश्न सोडवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केले. बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न …

Read More »

जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ‘मिशन मोड’ वर राबवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसुली कामकाज जलद व पारदर्शी करण्यात यावे. जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या ‘मिशन मोड’ वर राबवाव्यात. अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल प्रशासनाला दिल्या. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय …

Read More »