Breaking News

Tag Archives: industry

मुख्यमंत्री शिंदे यांचा मत, उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल मेट्रो-३ चा शुमारंभ होणार

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. उद्योगांना मिळणारी सुविधा, पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एका आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे …

Read More »

सर्बानंद सोनोवाल यांची माहिती, जहाज बांधणीसाठी २५ हजार कोटींच्या निधीची तरतूद दिर्घकालीन वित्त पुरवठा कऱण्याचा उद्देश

जहाजबांधणी मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार आणि त्यांना अनेक भागधारकांकडून इनपुट मिळाले आहेत आणि “जहाज बांधणीला मदत करण्यासाठी योजनांना अंतिम रूप देण्याच्या” प्रक्रियेत आहे. यामध्ये ₹२५,००० कोटींचा सागरी विकास निधीची तरतूद करणे समाविष्ट आहे, ज्याचे उद्दिष्ट कमी किमतीचे, दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्याचे धोरण असल्याची माहिती जहाज बांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. या …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, एमपीसीबी काय साध्य करू इच्छिते… फडणवीस प्रत्येक गोष्ट शुगर कोटिंग करून सांगतात

‘आधीच महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर जात असताना, जे उद्योग इथे वर्षानुवर्षे आहेत. ज्यांच्यामुळे हजारो-लाखो तरुणांना रोजगार मिळाले आहेत, त्या उद्योगांना त्रास देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय साध्य करू इच्छित आहे’ असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला. मर्सिडीज बेन्ज प्रकल्पावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नुकतीच धाड टाकली. तसेच …

Read More »

औद्योगिक उत्पादन ५ महिन्यांच्या उच्चांकावर जुलैमध्ये आयआयपी वाढ ५.७ टक्के

जुलै महिन्यात भारताच्या औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला आहे. उत्पादन, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे जुलैमध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) ५.७ टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जुलै २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर २.२ टक्के होता. जूनमधील आयआयपी दर ३.८ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये …

Read More »

प्रविण दरेकर यांचा आरोप, ठाकरे कुटुंबाचा कट उद्योगविश्वाने उधळला जागतिक उद्योगांना महाराष्ट्राचे आकर्षण

उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात १.३७ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, दिवस येतात आणि जातात जरा धीर धरा… महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न;मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार

महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला देखील आधार देण्याचं काम महाराष्ट्र करतो हे कुणीही विसरू नये अशी टीका करत महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात जरा धीर धरा आपले दिवस परत येतील असा सबुरीचा सल्ला राज्याचे माजी मंत्री …

Read More »

विदर्भ-मराठवाडयातील उद्योगांना २०२४ पर्यंत विद्युत शुल्क माफ उद्योग विकास-रोजगाराला मिळणार चालना

मुंबई: प्रतिनिधी विदर्भ मराठवाड्यातील उद्योजकांना विद्युत शुल्कात माफीची सवलत २०१३ ते २०१९ पर्यंत देण्यात आली होती. ही सवलत पुढील पाच वर्ष म्हणजे २०२४ पर्यंत लागू करण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ऊर्जा विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ मराठवाड्यात …

Read More »

बंद कारखान्याच्या जमिनीवर घरे बांधण्यास उद्योजकांना मोकळीक राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी महानगरे, शहरांमध्ये बंद पडलेल्या कारखान्यांच्या जमिनीवर आता घरे बांधून रग्गड नफा कमाविण्याचा मार्ग उद्योजकांना झाला असून अशा बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पाच्या जमिनीचा वापर निवासी घरे बांधण्याच्या निर्णयास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे मोठ मोठ्या उद्योगपतींना त्यांच्या कारखान्याच्या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात आज मंत्रालयात …

Read More »

प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली

मुंबईः प्रतिनिधी नोव्हेंबरमध्ये प्रमुख उद्योगांची कामगिरी चमकदार राहिली आहे. या महिन्यात प्रमुख ८ उद्योग क्षेत्रांनी ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ऑक्टोंबरमध्ये उद्योग क्षेत्राच्या वाढीचा दर ५ टक्के होता. ऱिफायनरी, सिमेंट आणि स्टील उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे प्रमुख उद्योग क्षेत्रांची कामगिरी चांगली राहिली असल्याचे उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले …

Read More »