Tag Archives: karnataka government

मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्रीय मंत्री पाटील यांना पत्र, अलमट्टीबाबत आदेश द्या पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आऱ. पाटील यांना हस्तक्षेपाची विनंती

कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदी काठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत असे …

Read More »

कर्नाटक सरकारने केली डिझेलच्या किंमतीत २ रूपयांनी वाढ विक्री करात ३ टक्क्याने वाढ केल्यानंतर लगेच हा निर्णय

विक्री करात ३ टक्के वाढ झाल्यानंतर कर्नाटकात डिझेलच्या किमती वाढणार आहेत, जो १ एप्रिलपासून लागू होईल. राज्य सरकारने मंगळवारी (१ एप्रिल) एक अधिसूचना जारी केली, ज्यामध्ये डिझेलवरील कर्नाटक विक्री कर (KST) १८.४ टक्क्यांवरून २१.१७ टक्के करण्यात आला, असे अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार. अखिला कर्नाटक पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या मते, डिझेलच्या किमती प्रति …

Read More »

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णयः मुस्लिम कंत्राटदारांना निविदांमध्ये ४ टक्के आरक्षण २ कोटी रूपयांपर्यंतच्या निविदेत ४ टक्के आरक्षण, भाजपाची काँग्रेसवर टीका

मुस्लिम कंत्राटदारांना निविदांमध्ये ४% आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. भाजपाने काँग्रेसवर “तुष्टीकरणाचे राजकारण” केल्याचा आरोप केला आहे आणि राहुल गांधी यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रभाव पाडल्याचा आरोप केला आहे. “कर्नाटक सरकारचा मुस्लिमांसाठी ४% आरक्षणाचा प्रस्ताव राहुल गांधींच्या पूर्ण पाठिंब्याने मंजूर करण्यात आला आहे. आम्ही हे …

Read More »

मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला निषेध

सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची टीका, वास्तवात न उतरणारी आश्वासन देणारी काँग्रेस कर्नाटकातील सरकारकडून एक गॅरंटी कमी करण्याच्या चर्चेवर सोडले टीकास्त्र

कर्नाटकात विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसने जनतेला पाच आश्वासनांची गॅरंटी दिली होती. मात्र कर्नाटक उमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी पाच पैकी एक गॅरंटी बंद करण्याचे सुतोवाच दिले. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी “चुकीचा संदेश” दिल्याबद्दल कडक शब्दात कानउघाडणी केली. राज्य सरकारच्या महिलांसाठी मोफत …

Read More »

कर्नाटक सरकारने सीबीआयला दिलेली परवानगी मागे घेतली सीबीआय पक्षपाती पद्धतीने तपास करते

कर्नाटक सरकारने गुरुवारी राज्यातील प्रकरणांच्या तपासासाठी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआय CBI ला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात आधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची पुष्टी करताना, कर्नाटकचे कायदा मंत्री एच.के. पाटील म्हणाले की, सीबीआयला दिलेली संमती मागे घेण्यात आली असली तरी प्रत्येक प्रकरणानुसार सीबीआयला परवानगी …

Read More »

पंतप्रधान मोदी उतरलेल्या हॉटेलचे थकीत बीलः वसुलीसाठी कायदेशीर मार्ग वापरणार कर्नाटक सरकारने अखेर दाखविली बिल भरण्याची तयारी

५० वर्षाच्या टायगर प्रोजेक्टच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हैसुर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरले होते. मात्र एक वर्ष झाला तरी पंतप्रधान मोदी हे उतरलेल्या हॉटेलचे बिल सरकारकडून दिले गेले नाही. त्यामुळे या हॉटेलच्या प्रशासनाने यासंदर्भात कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा देताच पंतप्रधान मोदी यांचे बिल कर्नाटक सरकारने भरण्याची …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मोदीजी, गेल्या ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज केले ते विसरलात का ? कर्नाटकवरचे कर्ज ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारचेच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर खोटे आरोप केले. कर्नाटक व राजस्थान सरकारने कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. वास्तविक पाहता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येऊन दोन महिनेच झाले आहेत. त्याआधी कर्नाटकात भाजपाचे सरकार होते. कर्नाटकातील ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारनेच कर्जाचा डोंगर उभा करुन …

Read More »

भाजपाचा सवाल, कर्नाटक सरकारची हिंदुत्वविरोधी भूमिका उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या शालेय पाठ्यपुस्तकांमधून रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि स्वा. सावरकर यांच्यावरील धडे वगळणे, धर्मांतर विरोधी कायदा रद्द करणे या निर्णयाबाबत उद्धव ठाकरे व संजय राऊत काही बोलणार आहेत का असा परखड सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

नाना पटोलेंची टीका, कर्नाटक सरकारच्या दादागिरीवर ईडी सरकारची अळीमिळी गुपचिळी केंद्र सरकार व भाजपाच्या आशिर्वादानेच कर्नाटक सरकारची दंडेली..

महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही अशा वल्गना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करत आहेत. सीमावाद प्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही कर्नाटककडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली जात आहे. पण कर्नाटकच्या या दादागिरीसमोर राज्यातील ईडी सरकार मात्र अळिमिळी गुपचिळी आहे, अशी टीका …

Read More »