Tag Archives: local bodies election

उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयुक्तांना इशारा, गुन्हा दाखल झाला पाहिजे, सजा झाली पाहिजे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून केली टीका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूक विषयक राजकारणाला गती आली आहे. मुंबईतील वरळीतील डोम मध्ये शिवसेना उबाठा गटाच्या वतीने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावरही टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील मतदार …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देत, संत तुकाराम महाराजांची मूर्ती दिली भेट

एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे, असेही यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

राज ठाकरे यांचा आरोप, महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये ९६ लाख खोटे मतदार घुसवले निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या मदतीसाठी केले कृत्य

दिवाळी सणाच्या तिसऱ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज रविवारी मनसे कार्यकर्त्यांचा आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की, २०१८ साली मी निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मी ईव्हीएम मशिन्सबाबत शंका उपस्थित केली होती. परंतु त्यावेळी कोणी आपल्या म्हणण्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्या

मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे.‌ विधानसभा निवडणुकीनंतर या चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर मोठा घोळ होऊ शकतो. ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्य …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात कार्यशाळा हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्याशाळेचे उद्घाटन, विजय वडेट्टीवार व डॉ. नितीन राऊत यांचेही मार्गदर्शन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार असून संविधानाला अभिप्रेत विकेंद्रित लोकशाही व महानगरपालिकांमधील राजकारण, या विषयावर प्रांताध्यक्ष हर्षवर्धन …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा विश्वास, मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार एकनाथ शिंदे यांनी साधला शाखाप्रमुखांशी संवाद

महापालिका निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा लढवण्यासाठी मिळणार हे महत्त्वाचे नसून मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकवणे हे आमचे ध्येय असल्याचे सांगत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजले आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुंबईतील शाखाप्रमुखांच्या …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल, भाजपाच्या दबावामुळे युतीपासून दूर राहतेय का? काँग्रेसकडून युतीचा हात पुढे करण्याकडे वंचित बहुजन आघाडीचे लक्ष

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे मी २१ मे रोजी स्पष्ट केले होते, तसेच माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनीही १८ जून रोजी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली होती, असे …

Read More »

छगन भुजबळ यांचे आवाहन, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुढे न्या

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयार असायला हवे. या काळात आपल्यावर अनेक हल्ले होतील मात्र न घाबरता न डगमगता आपल्याला त्यावर प्रतिहल्ला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी, ३१ जानेवारी निवडणूका घ्या राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काढला गळा

सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणी दरम्यान ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा राज्य सरकार अर्थात राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करत ४ महिन्यात निवडणूका घेण्याऐवजी जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूका घेण्याची परवानगी द्यावी यासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर मत चोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जयंत पाटील यांचे मार्गदर्शन यांचे

लोकसभेत आपल्या पक्षाने दहा पैकी आठ जागा जिंकत उत्तम कामगिरी केली. व्होट चोरीचे प्रकरण झाले नसते तर शशिकांत शिंदे यांची जागा देखील आपण जिंकलीच होती. विधानसभेत दुर्दैवाने अनपेक्षित निकाल लागला. असा निकाल का लागला याची कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर …

Read More »