Tag Archives: mahadev jankar

भाजपाने रासपला फसविले, धोका दिला महादेव जानकर यांच्या निमित्ताने महायुतीतील खदखद बाहेर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेने गतवेळच्याप्रमाणे महायुतीची घोषणा केली. या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विधानसभेच्या जागा दिल्या नसल्याची तक्रार राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगत आम्हाला फसविल्याचा जाहीर आरोप भाजपावर केला. महादेव जानकर यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपाने मला …

Read More »

भाजपाने मित्रपक्षांना त्यांची जागा दाखविली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेसाठी निवडणूका होत असून या निवडणूकीत भाजपा-शिवसेनेसोबत असलेल्या मित्रपक्षांना भाजपाने त्यांची जागा दाखविली अर्थात मित्रपक्षांना त्यांच्या उमेदवारांसाठी जागा दिल्याचा खुलासा करत आपल्या वक्तव्यातून निर्माण होणाऱ्या सूचक अर्थाची सारवा सराव करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. ओबीसी, भटके-विमुक्त, धनगर, कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदी समाजातील …

Read More »

अनुसूचित जमातीसाठीच्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजासाठीही नव्या १३ योजना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मंत्री डॉ. संजय कुटे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सारथीच्या धर्तीवर ‘महाज्योती’ महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असून ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवून अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण १३ योजना सुरु करणार असल्याचे कामगार, इमाव, …

Read More »

पालकमंत्री आणि आमदार दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि जनावरांच्या चाऱ्या देण्याबाबत सर्वतोपरी मदत करण्याची सरकारची भावना आहे. मात्र आचारसंहिता असल्याने त्यात अडचण येत आहे. यासंदर्भात आचारसंहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठविले असून त्याबाबतचा निर्णय येईल. तत्पुर्वीच प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री चारा छावण्या, पाण्याची परिस्थिती याचा आढावा घेतील अशी माहीती …

Read More »

मित्र पक्षांनी कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढवावी मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

मुंबईः प्रतिनिधी भाजप मित्रपक्षांच्या पदरात लोकसभेची जागा पडणार नसून बारामतीत ही कमळ चिन्हांवरच निवडणूक लढवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत युतीच्या महाआघाडीतील मित्रपक्षांना स्वतंत्र जागा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मीडिया रूम चे उदघाटन झाले यावेळी ते …

Read More »

पवारांच्या माघारीने महायुतीच्या नेत्यांमध्ये हर्षोल्लास युतीचा सर्वात मोठा विजय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतल्याचा निर्णय जाहीर करताच महायुतीतील रासपचे महादेव जानकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षोल्लास व्यक्त करत पवारांची रिंगणातून माघार म्हणजे युतीचा विजय असल्याचे प्रतिपादन केले. देशात आणि महाराष्ट्रात मोदींना पाठिंबा वाढतो आहे. मोदीजी एकदा म्हटले होते की बदललेल्या हवेचा …

Read More »

बारामती, माढासह ६ जागा रासपला द्या

राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची भाजपकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीत बारामती, माढा, हिंगोली, परभणी आणि अमरावती या सहा जागी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपने रासपला या ६ जागा द्याव्या अशी मागणी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपकडे केली. भाजपप्रणित लोकशाही …

Read More »

पशुआरोग्य सेवेतंर्गत ८० तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी दुर्गम, डोंगराळ, आदिवासीबहुल भागामधील पशुपालकांकडील पशुरुग्णांसाठी २०१८-१९ या वर्षापासून मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सूरु करण्यास तसेच या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८० तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  राज्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पशुपालकांना आपल्या पशुरुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याचदा आर्थिक …

Read More »

राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार देशी वाणाच्या गाई

पदुमकडून शासन निर्णय जारी मुंबई : प्रतिनिधी राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आणि इतर विभागाकडून पशुधनाचे वाटप करण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून देशी गाईंचेही वाटप करण्यात येणार आहे. दुधाळ संकरीत गाई, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये ही या देशी गाईंचा समावेश करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी …

Read More »

आरक्षणातील सर्व समाज एकत्र आले तर सर्वांची दांडी गुल ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आरक्षण घेणारा ५४ टक्के समाज आहे. तर एस.सी. आणि एस.टी. समाजातील २० टक्के असे सर्व समाज जर एकत्र आले तर इतर सर्व समाजाची दांडी गुल गुल होईल असे सुचक वक्तव्य ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. तसेच आगामी काळात ओबीसी समाजाबरोबरच राज्यातील …

Read More »