पवारांच्या माघारीने महायुतीच्या नेत्यांमध्ये हर्षोल्लास युतीचा सर्वात मोठा विजय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतल्याचा निर्णय जाहीर करताच महायुतीतील रासपचे महादेव जानकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षोल्लास व्यक्त करत पवारांची रिंगणातून माघार म्हणजे युतीचा विजय असल्याचे प्रतिपादन केले.
देशात आणि महाराष्ट्रात मोदींना पाठिंबा वाढतो आहे. मोदीजी एकदा म्हटले होते की बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवार यांना लवकर येतो, त्याचमुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता आता कोणतीही लाट वगैरे दिसत नाही असंही म्हटलं आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मोदींचा वाढता पाठिंबा पवारांना लक्षात आला आहे. त्यामुळेच त्यांनी माघार घेतल्याचे ते म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळा विकासकामांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरा-मोहरा बदलणार विविध विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *