Tag Archives: Mahakumbh Mela

लालूप्रसाद यादव यांची टीका, महाकुंभ फालतू …काही अर्थ नाही दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू

१४४ वर्षानंतर महाकुंभ मेळावा आल्याचे सांगत आणि हा महाकुंभ महिनाभर चालणार असल्याचा प्रचार उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने देशभरात मोठ्या प्रमाणावर केला. या महाकुंभबद्दल आस्था निर्माण व्हावी याकरिता मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आणि त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपाशासित राज्याचे …

Read More »

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० हून अधिक !

महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर …

Read More »

भाजपाच्या विजयासाठी महाकुंभमधील मोदी-शाह-रामदेव यांची डुबकी कामाला आली अमेरिकेने भारतीय नागरिकांना दिलेल्या अपमानजनक वागणूकीचा मात्र दिल्लीतील मतदारांवर कोणताच परिणाम नाही

मागील महिनाभर दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा माहोल दिल्लीसह संपूर्ण देशभरात भाजपाने उभारण्यात यशस्वीरित्या निर्माण करण्यात नेहमीप्रमाणे यश मिळवले. या माहौलमध्ये भाजपाची आघाडी आणि निवडणूकीच्या दृष्टीकोनातून दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना लीकर पॉलीसी प्रकरणी तुरुंगात टाकण्यापासून ते त्यांच्या शासकिय निवासस्थानी आणि बँक खात्यांची झाडा झडती …

Read More »

महाकुंभ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डुबकी आणि दिल्लीतील मतदान सर्वाधिक डुबकी तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नावावर

नवीन कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धेच्या ठिकाणी काहीतरी करतात, जो चर्चेचा विषय बनतो. आता प्रयागराजची महाकुंभ मेळा घ्या. येथील पवित्र संगमामध्ये त्यांनी केलेली डुबकीदेखील चर्चेचा विषय आहे. ते अशा वेळी दिल्लीतील दिल्लीकर मतदान करत होते, सत्ताधारी पक्षाची किंवा विरोधी पक्षाची बोट बुडवण्यासाठी मतदान करत होते. तसे पाहता, सनातन धर्मावर विश्वास …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा चेंगराचेंगरीच्या घटनेवरून आरोप, व्हिआयपी कल्चरमुळे घटना कुंभमेळ्यात अर्धवट व्यवस्था आणि व्हिआयपी कल्चर

महाकुंभात अर्धवट व्यवस्था, व्हीआयपी कल्चर आणि व्हीआयपींनी स्वतःहून केलेले प्रचार यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे अनेकांचे जीव गेले, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सभास्थळी व्हीआयपी कल्चरवर बंदी घालण्याची मागणीही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मल्लिकार्जून खर्गे यांनी त्यांच्या एक्सवरील अकाऊंटवर म्हणाले की, “महाकुंभमेळ्यादरम्यान तीर्थराज …

Read More »

मौनी अमावस्येच्या अंधारात नागरिकांचा आक्रोशयुक्त मृत्यू चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तीर्थक्षेत्राबद्दलच्या आशा भंग

महाकुंभमेळ्याच्या विस्तीर्ण परिसरात रात्र पडेपर्यंत, पवित्र नदीकाठ दुःखाचे आणि गोंधळाचे दृश्य बनले होते, ‘मौनी अमावस्ये’ रोजी ‘अमृत स्नान’ साठी जमलेल्या भाविकांनी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पोलिस अधिकारी मानवी साखळ्या बनवत, सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी लाऊडस्पीकरवरून सूचना देत असताना, घाटांवर फाटलेले चप्पल, टाकून दिलेले कपडे आणि वैयक्तिक सामान विखुरलेले होते. बुधवारी …

Read More »

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या प्रती श्रद्धांजलीः मुख्यमंत्री योगी म्हणाले परिस्थिती नियंत्रणात स्थगित केलेले शाही स्नान दुपारी २.३० वाजता सुरु

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान संगममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. जखमींच्या लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यात गुंतले आहे. काही काळापूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि काही …

Read More »

महाकुंभ मेळ्यात पहाटेच्यावेळी चेंगराचेंगरीची घटना, १५ जण मृत्यूः संख्या वाढण्याची शक्यता मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास शाही स्थानासाठी उडालेल्या झुंबडमुळे चेंगराचेंगरी

बुधवारी (२९ जानेवारी २०२५) पहाटे महाकुंभाच्या संगम परिसरात मौनी अमावस्येनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी यात्रेकरू जागेसाठी धावपळ करत असताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, नदीत स्नान केल्याने गरिबी दूर होते का? अन्न मिळते का ? अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी गंगा नदीत केले स्थान

नदीत डुबकी मारल्याने देशातील गरिबी कमी होणार आहे का, गरिबांच्या पोटाला अन्न मिळणार आहे का असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाला यावेळी केला. मध्य प्रदेशातील महू या गावी जय संविधान-जय बापू-जय भिम या काँग्रेसच्या अभियानात मल्लिकार्जून खर्गे बोलत होते. यावेळी बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, इथे बेरोजगारांना …

Read More »

मकर संक्रात आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळला निफ्टी २५० अंकानी तर बीएसई ८४० पेक्षा जास्त घसरला

आज आठवड्याचा पहिला दिवस असतानाही आणि मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर ४७ वर्षानंतर पहिल्यांदाच आलेल्या महाकुंभ मेळाव्याला आज सुरुवात झाली. मात्र शेअर बाजारावर आज दबाव असल्याचे दिसून आले. निफ्टी ५० १.१% किंवा २५० अंकांपेक्षा जास्त घसरून २३,१७२.७० वर पोहोचला. तर बीएसई सेन्सेक्स ८४० अंकांपेक्षा जास्त घसरून ७६,५३५.२४ वर पोहोचला. व्यापक बाजार निर्देशांक, निफ्टी …

Read More »