मागील महिनाभर दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा माहोल दिल्लीसह संपूर्ण देशभरात भाजपाने उभारण्यात यशस्वीरित्या निर्माण करण्यात नेहमीप्रमाणे यश मिळवले. या माहौलमध्ये भाजपाची आघाडी आणि निवडणूकीच्या दृष्टीकोनातून दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना लीकर पॉलीसी प्रकरणी तुरुंगात टाकण्यापासून ते त्यांच्या शासकिय निवासस्थानी आणि बँक खात्यांची झाडा झडती घेण्यापर्यंतच्या अनेक योजनांची रणनीती भाजपाने यशस्वीरित्या पार पाडली. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या आणि आम आदमी पार्टीच्या पक्षाला पराभूत करण्यात करण्यात महत्वाच्या अशा दोन गोष्टी घडल्या. त्यामुळे आदमी पार्टीच्या पाठीशी उभे राहिलेले जनमत (?) भाजपासोबत कधी गेलं हे लक्षात यायला बराच उशीर झाल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता जानेवारी महिन्याच्या मध्याला किंवा आधी काही दिवस कॅगचा अहवाल बरोबर बाहेर आला. त्या अहवालातून मुख्यमंत्री निवासस्थानासाठी वारेमाप पैशाची उधळपट्टी करण्यात आल्याचा मुद्दा भलताच तापला. भ्रष्टाराच्या विरोधात स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीकडून कोट्यावधी रूपये अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानावर खर्च करण्यात आलाचा मुद्दा कॅगच्या माध्यमातून पुढे आणण्यात आल्याने त्याची दखल भाजपाने व्यवस्थितरित्या घेतली. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीशमहलचा दाखल देत आम आदमी पार्टीवर चांगलीच टीका केली. त्यातच आम आदमी पार्टीचा उल्लेख आप-दा करत आणखीनच आम आदमी पार्टीला राजकियदृष्ट्या आणखीनच अडचणीत आणले.
भाजपाच्या अर्थात मोदींच्या या आरोपाला उत्तर म्हणून आम आदमी पार्टीने भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरून लोकसभा निवडणूक नोंदणीकृत करण्यात आलेल्या मतदारांच्या संख्येपेक्षा वाढीव संख्या नोंदविण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याविषयीची अधिकृत माहिती आम आदमी पार्टीने प्रसारमाध्यमांसह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नजरेसमोर आणून दिली. त्याचबरोबर भाजपाच्या अनेक उमेदवारांनी खुले आम मतदारांना खुष किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी अनेक वस्तूंचे वाटप केल्याची माहिती आणि व्हिडीओ या दोन्ही गोष्टीही आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र निवडणूक आयोगाकडून नेहमीप्रमाणे आम आदमी पार्टीच्या आरोपात तथ्य आढळून आले नाही.
या सगळ्या घडामोडीत १४४ वर्षानंतर भाजपाच्या दृष्टीने राजकिय प्रचार आणि स्वतःचे हिंदूत्ववादाचा चेहरा दाखविण्यासाठी महाकुंभ मेळ्यासारखी चांगली दुसरी संधी कशी मिळणार असणार. या कुंभमेळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून ते सर्व नेते अमित शाहपर्यंतचे सर्व नेत्यांनी प्रयागराजच्या नदीत आणि संगम कट्ट्यावर डुबकी मारत दिल्लीतील विधानसभा निवडणूकीला अप्रत्यक्षरित्या धार्मिक करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर दिल्लीत ५ तारखेला मतदान होणार असताना ५ फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गंगा नदीत डुबकी घेण्याची आठवण झाली नाही. मात्र त्यांनी दिल्लीच्या मतदारानाच्या दिवशीच प्रयागराजमधील गंगा नदीत डुबकी घेत हिंदूत्वाचा ओळखीचा पुरावा सर्वांसमोर ठेवला. दरम्यानच्या कालावधीत प्रयागराजमध्ये शाही स्थानाच्या निमित्ताने झालेल्या चेंगाराचेंगरीच्या घटनेत अनेक सर्वसामान्य भाविक, नागरिक मृत्यूमुखी पडले तर काहीजण कायमचे जायबंदी झाले. त्या घटनेची साधी आठवणही पंतप्रधान नरेंदर मोदी यांनी प्रयागराजमधील डुबकी घेते वेळी किंवा डुबकी घेऊन बाहेर आल्यानंतर साधीही काढली नाही.
मात्र त्याच दिवशी दुपारी १.३० मिनिटांनी अमेरिकन सैन्याचे एक विमान अमेरिकेत अनधिकृतरित्या स्थलांतरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १०४ भारतीय नागरिकांना हाता-पायात बेड्या घालून पंजाबमधील अमृतसर विमानतळावर आणून सोडले. परंतु त्या डुबकी घेण्यात मग्न असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या अशा पद्धतीने भारतात अमेरिकेने भारतीयांना आणल्याचे त्यांच्या गावीही कदाचित नसावे. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या दिवशीही त्याविषयी साधा ब्र ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढला नाही.
तसेच निवडणूक आयोगाने मतदानाची अधिकृत अंतिम आकडेवारी मतदानाची प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतरही आणि त्याच्या दुसऱ्यादिवशी अर्थात कालपर्यंत अधिकृत्या जारी केली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतदानाची वाढीव आकडेवारी आणि पडलेली मते बाहेर आली त्या पद्धतीने दिल्लीतील मतदान पार पाडले आणि निकाल लागल्याची चर्चा राष्ट्रीय राजकारणा चांगलीच रंगत चालली आहे.
Marathi e-Batmya