Tag Archives: MahaNCPSpeaks

कोणी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यावी? शरद पवार यांचा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर शरद पवार यांची खोचक टीका

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर १८ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. हा राहिलेला कमी कालावधी पाहता प्रत्येक राजकिय पक्षाच्या नेत्याकडून प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यावर आरोपांचा धडका अद्याप सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे …

Read More »

अजित पवार यांचा दावा, त्या सरकारसाठी अदानी, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक औट घटकेच्या सरकारचा शपथविधी शरद पवार यांच्या सांगण्यावरून

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होण्यापूर्वी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होण्यासाठी गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तसेच शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच त्यावेळी सरकार स्थापन करण्यात आले. तसेच यासंदर्भात गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. तसेच त्या बैठकीला अमित शाह …

Read More »

नवाब मलिक यांचा दावा, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची पॉलिटिकल अडजेस्टमेंट ;शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम...

राजकारणात कुणीही परममित्र किंवा परमशत्रू असत नाही. वेळेनुसार सर्व बदलत असतात. २०१९ मध्ये अशाप्रकारे सरकार बनवले जाईल असे कुणाला वाटले होते का. मात्र वेगळे घडले त्यामुळे २३ नोव्हेंबरला निकाल आला की, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब …

Read More »

नवाब मलिक यांना पुन्हा ईडीकडून अटकेची शक्यता ? उच्च न्यायालयात धाव घेतल्याने अटकेची शक्यता बळावली

सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना ३० जुलैला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय जामीन घेताना त्यांनी आपले अनेक अवयव निकामी झाले असून तातडीच्या उपचारांची गरज आहे, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे उच्च न्यायालयात नवाब मलिकांच्या जामीनाचे प्रकरण प्रलंबित असल्याने तो निर्णय लागत …

Read More »

ईडीची उच्च न्यायालयात धाव नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार) नवाब मलिक यांनी अंतरिम वैद्यकीय जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्या दावा करून त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. अंतरिम जामिनाच्या रुपी मिळालेल्या स्वातंत्र्याचा मलिकांकडून गैरवापर सुरू असून निव़डणूक प्रचाराच्या निमित्ताने ते साक्षीदारांना प्रभावित करीत असल्याचा …

Read More »

सुनिल तटकरे यांनी या आठ पदाधिकाऱ्यांवर केली निलंबनाची कारवाई पक्षविरोधी भूमिका घेत महायुतीची प्रतिमा मलिन करणार्‍यांवर कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करुन पक्षविरोधी भूमिका घेतली शिवाय महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग केल्याने आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. सुनिल तटकरे यांनी निलंबित केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष …

Read More »

अजित पवारच उतरले नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी भाजपाच्या नाकावर टिच्चून नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला

भारतीय जनता पार्टीचा विशेषता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचंड दबाव आणि कडाडून विरोध असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला आणि सना मलिक यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत अजित पवार सहभागी झाले. अजित भाजपाच्या दबावाला अजिबात बळी पडले नाहीत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची …

Read More »

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा जाहीरनाम्यात ११ नवीन आश्वासने समाविष्ट ;अजित पवारांनी बारामतीतून तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुंबईतून केला जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील लढवत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा (महाराष्ट्र घोषणापत्र) आज प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या सर्व मतदारसंघात एकाचवेळी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बारामतीतून अजितदादा …

Read More »

सुनिल तटकरे म्हणाले, एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालू मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक होईल असा प्रयत्न

अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील …

Read More »

अपघातात जखमी झालेले नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर नवाब मलिक यांच्यावर दुःखाचा डोंगर

यंदाची दिवाळीचा सण आणि विधानसभेच्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखुर्द शिवाजीनगर मधील उमेदवार नवाब मलिक यांना काही धार्जिण होताना दिसत नाही. आधीच काही काळ भाजपाच्या आरोपामुळे तुरुंगवास भोगाव लागलेल्या नवाब मलिक यांना कसेतरी जामीन मिळाला. त्यास काही महिन्यांचा अवधी लोटत नाही तोच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवारीला भाजपाने विरोध सुरु करण्यास सुरुवात …

Read More »