राज्यात महायुती सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर या महायुती सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पिय अधिवेशन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सदस्यांसमोर अभिभाषण करत राज्य सरकारच्या पुढील वाटचालीबाबतच्या धोरणाची माहिती दिली. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुढे म्हणाले की, शेतकरी, महिला,समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्याचसोबत …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी या दोन मंत्र्यांची नोडल म्हणून नियुक्ती मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्यावर जबाबदारी
गेली अनेक वर्षे रखडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर मार्ग काढण्यासाठी गतवर्षी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एस आर बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूच्या मंत्र्याचा समावेश असलेली समिती स्थापन करून त्या माध्यमातून सीमा प्रश्नावर मार्ग काढावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, सीमावर्ती भाग केंद्रशासित करा मराठी भाषिकांच्या पाठीशी सर्वपक्षियांनी खंबीरपणे उभे रहावे !
निपाणी, बेळगाव आणि कारवार असा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र सीमावाद प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत हा विषय प्रलंबित आहे, तोपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित होण्याविषयी ठराव करायला हवा. सर्व पक्षांनी मराठी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत आज सोमवारी केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री …
Read More »अजित पवार यांचा इशारा, कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही विधानसभेत अजित पवारांचा आक्रमक पवित्रा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, सीमाप्रश्नाची बैठक फक्त १५ मिनिटात झाली? सीमाप्रश्नी होयबा मुख्यमंत्री दिल्लीची वाट पहात होते का?
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. मात्र ही बैठक फक्त १५ मिनिटात आटोपल्याबाबतचा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून विचारला असता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयावरची बैठक फक्त १५ मिनिटात कशी काय पार पडली?. असो त्या बैठकीत काय ठरले ते ठरले. …
Read More »दोन्ही मुख्यमंत्र्यांबरोबरील बैठकीनंतर अमित शाह म्हणाले,.. तोपर्यंत कोणीही बोलणार नाही पंचसूत्री वापर करत दोन्ही राज्याच्या मिळून सहा मंत्र्यांची समिती प्रश्न सोडवेल
मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने विधाने करत महाराष्ट्रातील काही भागांवर दावा केला. तसेच महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्लेही झाले. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आज अमित शाह यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे …
Read More »उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर टीका, दिलेलं स्क्रिप्ट फक्त बोलतात.. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे आक्रमक उत्तर द्यावं
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दांत हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »उध्दव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान, …मग खुशाल तुम्ही महामार्गाचे उद्घाटन करा पालकासारखे बोला नाहीतर पालकाची भाजी समजून बोलू नका
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव …
Read More »अमित शाह यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्याची नोंद घेतील असा विश्वास कर्नाटक आणि राज्यपालांच्या विरोधात तक्रारी केल्या
मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे अवमानकारक वक्तव्य केले. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करण्यास सुरुवात करत उचकाविण्याचाही प्रयत्न केला. या सर्व प्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, म्हणून मुख्यमंत्री कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत शिवसेनेचे नाहीतच ते भाजपाचेच मुख्यमंत्री...
राज्यात घडणाऱ्या सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही असे स्पष्ट करतानाच सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत आणि महाराष्ट्राचे …
Read More »
Marathi e-Batmya