Tag Archives: mahavikas aghadi

फडणवीसांच्या आरोपाला भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर, म्हणूनच त्यांच्या मनात अटकेची भीती चर्चाच नव्हती पण कोठे तरी काही तरी घडलं असावं

आगामी महापालिका निवडणूका आणि त्यानंतर होणार असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय धोरण ठरविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक नाशिक येथे पार पडली. या बैठकीत पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप करताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने भाजपा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. …

Read More »

जाताना तरी राज्यपाल, शिंदे-फडणवीस सरकारचे ते गुपीत सोबत घेऊन जाणार की ? शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्ता स्थापनेची ती कागदपत्रे अद्यापही कोश्यारींकडेच

राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या पाठिब्याने आणि भाजपाच्या मदतीने महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या सत्ता स्थापनेसाठी शिंदे-फडणवीसांकडून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचा आणि पुरेसे संख्याबळ असल्याचे पत्र कोणत्या आधारावर आणि कोणत्या पक्षाच्या नावावर सादर केले याचे गुपीत माहिती अधिकारात …

Read More »

राहुल कलाटे म्हणाले, होय मला अजित पवार, उध्दव ठाकरेंचा फोन होता… पिंपरी चिंचवडची निवडणूक आता तिरंगी

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढविणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडूनही या जागेसाठी आग्रही दावा करत राहुल कलाटे हे संभावित उमेदवार असतील असे संकेतही दिले. मात्र अखेर अजित पवार यांच्या आग्रहामुळे शिवसेने ही जागा राष्ट्रवादीला …

Read More »

पिंपरी-चिंचवड उमेदवारीवरून अजित पवार म्हणाले, बोलणं झालं उध्दव ठाकरेंचा आघाडीला पाठिंबा ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांनी शांत रहावं यासाठी प्रयत्न

पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली. सुरुवातीला या जागेसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेने माघार घेतली. मात्र ठाकरे गटाचे संभावित उमेदवार राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीचे अर्थात राष्ट्रवादी …

Read More »

आदित्य ठाकरेंचा सवाल, ते ४० गद्दार सांगू शकतात का? राज्यातील जनतेला बंडखोरी आवडलेली नाही

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर असून बंडखोर शिंदे गटावर टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात वातावरण इतकं पेटलं आहे जर आजच निवडणूक झाली तर निकालानंतर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा. आता काही लोक विचारतील की भगवा रंग कुणाचा? कुठल्या गटाचा? तर …

Read More »

नाना पटोलेंची टीका, भाजपा टिळक कुटुंबाला विसरली कसबा व चिंचवडमधून महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील

पुण्यातील कसबा व चिंचवड मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्रितपणे लढवत आहे. या दोन्ही जागांवरही महाविकास आघाडीचेच उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन कसबा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांची …

Read More »

राज ठाकरेंचे पत्राद्वारे आवाहन, जो उमदेपणा भाजपाने दाखविला तोच महाविकास आघाडीने दाखवावा बिनविरोध पोटनिवडणूकीसाठी राज ठाकरेंचे विरोधकांना आवाहन, पण..

पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (५ फेब्रुवारी) सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून आवाहन केलं आहे. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं आवाहन राज ठाकरेंनी पत्राद्वारे केले. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या …

Read More »

पुणे जिल्ह्यातील पोट निवडणूकीवरून अजित पवार म्हणाले, बिनविरोध होण्याचे कारण काय? पंढरपूर, कोल्हापूर, नांदेड येथील निवडणूक बिनविरोध झाली नव्हती

राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही उतरण्याची तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतानाच आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला आवाहन …

Read More »

पिंपरी-चिंचवडच्या जागेवर शिवसेनेचा दावा मात्र अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता

नुकत्याच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-शिंदे गटाचा दोन ठिकाणी महाविकास आघाडीने पराभव केला. त्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर असून या दोन्ही जागा महाविकास आघाडी लढविणार असल्याचे जाहिर करण्यात आले. मात्र पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेनेने दावा केला. तसेच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही …

Read More »

पुणे-पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीसाठी मविआचे उमेदवार उद्या जाहीर जयंत पाटील, नाना पटोले आणि सुभाष देसाई यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती

पुणे शहरातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून भाजपा- शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यावेळी पहायला मिळणार आहे. या दोन्ही जागेवर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच …

Read More »