Tag Archives: mahavikas aghadi

अजित पवार यांच्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांचा प्रति सवाल, आरडाओरड कशासाठी? क्रिडा प्रकारात फक्त समावेश केलाय वेगळं आरक्षण दिलं नाही

राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार स्थापनान्न झाले. मात्र हे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेत घडवून आणण्यात आलेल्या बंडावरून सध्या महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातही यासंदर्भात महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच …

Read More »

पावसाळी अधिवेशन: गद्दारांना ताट – वाटी… चलो गुवाहाटी ईडी सरकार हाय हाय.. फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो...

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. विधानसभेच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… ईडी सरकार हाय …

Read More »

उध्दव ठाकरेंचा निर्णय फिरवत शिंदे सरकारने महापालिका नगरसेवकांची संख्या घटविली मुंबईत २३६ ऐवजी २२७ नगरसेवक राहणार अन्य महापालिकेतील नगरसेवक संख्या कमी होणार

तत्कालीन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमधील सदस्य संख्या वाढीचा निर्णय आज शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल ठरवित २०१७ साली झालेल्या निवडणूकांमध्ये असलेल्या जागा इतकीच सदस्य संख्या ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री …

Read More »

संजय राऊत यांच्यावरील धाडीवरून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,चौकशी होऊ द्या… त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच

पत्रावाला चाळ प्रकरणी तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीला हजर राहिले नाहीत म्हणून आज सकाळी ईडीने संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर धाड टाकत त्यांची चौकशी सुरु केली. जवळपास साडे नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीची भाजपासह शिंदे गटाने स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारण्यात आले …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच सुटला असे दिसत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा दिलेला निकाल हा अत्यंत धक्कादायक आहे. राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. …

Read More »

सत्तांतरानंतर सही होताच मोदी सरकारने काढली बुलेट ट्रेनच्या कामाची निविदा बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाची निविदा जाहीर

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकाविणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्य सरकार स्थापन केले. या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी लागणाऱ्या बीकेसीतील जागेच्या हस्तांतरणावरसह सर्व कागदपत्रांवर …

Read More »

उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित रामदास कदमांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ आली नसती

काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांच्या विरोधात दापोलीतील रिसॉर्टप्रकरणाची माहिती भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुरविल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर रामदास कदम हे सातत्याने मातोश्रीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. तसेच उध्दव ठाकरे यांना भेटून प्रत्यक्ष आपली बाजू मांडण्याऐवजी त्यांनी पत्र लिहून या प्रकरणात काहीही संबध नसल्याचे …

Read More »

संजय राऊत म्हणाले, दोघाचंच मंत्रिमंडळ पाह्यला का? बेकायदेशीर आहे माझी टीका झोंबते ना पण मी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्यावतीने बोलतोय

राज्यातील महाविकास आघाडीला घालवून शिंदे-फडणवीस यांचे सरकार नव्याने स्थानापन्न झाले. या नव्या सरकारला राज्यात येवून १५ दिवस होवून गेले. तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच मंत्रिमंडळाने आतापर्यत दोनवेळा मंत्रिमंडळ बैठक घेत निर्णय घेतले. यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी …

Read More »

औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्कामोर्तब औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर

अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र या स्थगितीवरून सर्वचस्थरातून टीका व्हायला लागल्यानंतर …

Read More »

बाळ‌ासाहेब थोरात यांचा सवाल, ते निर्णय घेण्याचे फलित काय ? भाजपाच्या द्रौपदी मुर्मूंना शिवसेनेने दिलेला पाठिंबा जनतेला आवडला नाही..

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला पण तो घेण्याआधी त्याचे फलित काय? हे तपासणे आवश्यक होते. हा निर्णय जेव्हा पूर्वी झाला, तेव्हा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत व्यवस्थित चालते आहे का? हे जर त्यांनी तपासले असते तर …

Read More »