महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडूण जाणाऱ्या एका जागेकरीता अजित पवार यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिलं जात असताना मात्र महायुतीचे तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांपैकी एकही नेता यावेळी उपस्थित …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, आकस कायम… निधी वाटपात महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय मोदी-शाहसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस अजित पवारांची हिम्मत नाही
महाराष्ट्रातून जीएसटीसह सर्व प्रकारच्या कर संकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यांना निधी वितरण करण्यात आले. यामध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेशला सर्वात जास्त २५ हजार कोटी रुपये, मध्य प्रदेशला १० हजार …
Read More »महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे हे उमेदवार विजयी काँग्रेसचे ३, अजित पवार गटाचा एक, एकनाथ शिंदे गटाचा दोन, उबाठा गटाला २, शरद पवार गटाला ४
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे कल जाहिर होण्यास सुरुवात झाली. साधारणतः दिड वाजल्यापासून विजयी उमेदवार घोषित होण्यास सुरुवात झाली. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे संजय काका पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे पैलवान उमेदवार …
Read More »महाराष्ट्रातील किती जागांवर महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवार आघाडीवर टेड्रिंगमध्ये महाविकास आघाडी ११ आणि महायुती ११ लोकसभा मतदारंसघात पुढे
लोकसभा निवडणूक २०२४ साठी १ जूनला सातव्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर आज ४ जूनला ५४३ लोकसभा मतदारंघातील जागांची मतमोजणी सुरु आज सकाळी सुरु झाली. महाराष्ट्रातही ४८ लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झाले. या ४८ मतदारसंघात काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीचे कोणते उमेदवार पुढे आणि कोणते उमेदवार मागे …
Read More »सुप्रिया सुळे यांची टीका, हे सरकार घर फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीत व्यस्त कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश
हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला. पुण्यातील सारसबागे समोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रियाताई सुळे यांनी …
Read More »राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही
स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली असती, तर देश पाच दशके पुढे गेला असता. नैराश्याने ग्रासलेल्या आणि भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवाजी पार्कवरील विराट विजय संकल्प सभेत …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा आरोप, ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कट
कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकले, आता हाच फॉर्म्युला देशभर राबविण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापूर येथे जाहीर सभेत बोलताना केला. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत …
Read More »‘महायुती’ च्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांचा शरद पवारांवर आरोप
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते …
Read More »महायुतीतील शिंदे गटावर जाहिर केलेल्या उमेदवारांची नावे घेतली मागे
महायुतीतील भाजपाच्या वरचष्म्यामुळे शिवसेना शिंदे गटाने जाहिर केलेल्या चार उमेदवारांची नावे मागे घेण्याची पाळी शिंदे गटावर आली आहे. आधीच शिवसेना शिंदे गटाच्या अनेक उमेदवारांची नावे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी जाहिर करण्यावर भाजपाचा आक्षेप होता. तसेच काही उमेदवार पराभूत होणार असल्याचा अहवाल भाजपाच्या हाती होता. त्यामुळे विद्यमान खासदारांना पर्यायी नावांचा प्रस्ताव …
Read More »महायुतीत आणि महाविकास आघाडीत नेमका वरचष्मा कोणाचा?
देशात लोकसभा निवडणूकीचे रणशिंग फुकले गेले आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाचा समावेश आहे. या दोन्ही तिन्ही पक्षांच्या आघाडी आणि युतीतील …
Read More »
Marathi e-Batmya