मुंबई : प्रतिनिधी पुढील सहा ते सात दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले. त्यानुसार आज गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवातीलाच मंत्रालयातील अँनेक्स इमारतीमधील सातव्या मजल्यावर पावसाने छत कोसळून गळती लागल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्यामुळे राज्य सरकारच्याच व्यवसथेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. अँनेक्स इमारतीच्या ७ व्या …
Read More »मंत्रालयासमोर न्याय मागण्यांसाठी निदर्शने करणाऱ्या अंधानाही पोलिसी खाक्या सरकार दाद देईना आणि पोलिस आंदोलन करू देईना अशी अंधाची अवस्था
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या गलथान आणि ढिसाळ कारभारामुळे मंत्रालयात येवून किंवा मंत्रालयाच्या समोर निदर्शने आपल्या न्याय मागण्यांच्या प्रश्नी दाद मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता अंध व्यक्तींनीही न्याय मागण्याच्या प्रश्नी दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात मंत्रालयासमोर निदर्शने सरकारच्या नावाने भोपळा फोड आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने रोजगार उपलब्ध करून देणार, उद्योग आणण्याच्या घोषणा दिल्या. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने दिलेल्या नसल्याच्या निदर्शनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत भोपळा फोड आंदोलन केले. त्यामुळे प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दरवर्षी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार, …
Read More »त्या तरूणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पेपर तपासणीचे कृषीमंत्र्याचे आदेश वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय देण्याची कृषीमंत्र्यांनी दिली ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश शेटे याच्या कृत्याची तात्काळ दखल घेत कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी शेटेने दिलेल्या सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठीच्या २०१३ च्या परीक्षेतील उत्तर पत्रिकेची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच त्याचे सांत्वन करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले. कृषीमंत्र्यांना या …
Read More »आणि एका तरूण शेतकऱ्याचा मंत्रालयातील आत्महत्येचा प्रयत्न फसला पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोलापूरच्या सदाशिव धावरेचे प्राण वाचले
मुंबई: प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील तरूण शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्या करण्यासाठी विषाची बाटली सोबत घेवून मंत्रालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयातील पोलिसांनी सदर शेतकऱ्याकडून किटकनाशकाची बाटली काढून घेत त्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे मंत्रालयात येवून शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला. …
Read More »गरीबांसाठी घराची अर्थसंकल्पात घोषणा, तर मुंबईतल्या गरीबांचे मंत्रालयात आंदोलन ओंकार बिल्डर्स विरोधातील आंदोलनानंतर नागरीकांना पोलिसांकडून अटक
मुंबईः प्रतिनिधी एकीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील गरिबांना २०२२ पर्यंत सर्वाना घरे देण्याचे आश्वासन देवून केंद्र सरकारला २४ तासांचा अवधी होत नाही. तोच मालाड येथील नियोजित एसआरए प्रकल्पातील घरे मिळावीत यासाठी ओकांर बिल्डर्सच्या विरोधात शेकडो झोपडीवासीयांनी मंत्रालयात घुसून ठिय्या आंदोलन केले. मालाड पूर्व येथील कुरार इथल्या शांताराम तलाव येथील जानू भोईर …
Read More »सरपंच पतींनी घातला मंत्रालयात गोंधळ सरपंच पत्नीच्या मागे जाण्यापासून पोलिसांनी रोखले
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेकडून थेट नव्याने निवडूण आलेल्या सरपंचांचे सरपंच दरबार मंत्रालयात आयोजित करण्यात आला. मात्र या दरबारात पत्नी सरपंचांबरोबर आलेल्या पती सरपंचाची गर्दी होवू लागल्याने अखेर पती सरपंचाना बाहेर काढण्याची पाळी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्यांवर आली. त्यामुळे सरपंच परिषदेसाठी आलेल्या सरपंच पतिराजांनी मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर गोंधळ घातल्याची …
Read More »३०० हून अधिक कक्ष अधिकाऱ्यांचा सहसचिव होण्याचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाच्या निकालाने थेट भरती झालेल्यांना दिलासा
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात थेट भरतीतून नोकरीस लागलेल्या असंख्य कक्ष अधिकाऱ्यांना पात्रता असूनही केवळ सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नतीतून पुढे येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे लवकर पदोन्नती मिळत नव्हती. त्यामुळे मंत्रालयात थेट भरती झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय घेत थेट कक्ष अधिकारी …
Read More »भीमा कोरेगांवप्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे मंत्रालयात आंदोलन १८ आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अटक
मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगांवसह चार गांवामध्ये झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे मंत्रालयाचा संपूर्ण परिसर दणाणून गेल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे साधारणतः १८ कार्यकर्त्ये मंत्रालयात आले. त्यानंतर त्यांनी थेट …
Read More »
Marathi e-Batmya