मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील आरक्षित पदोन्नतीतील पदांसह सर्व पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने यासंदर्भात शासन निर्णयही जाहिर करण्यात आला आहे. मात्र पदोन्नतीतील आरक्षण देण्याबाबतची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने हि सर्व पदे तात्पुरत्या स्वरूपात सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात …
Read More »मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनो, दोन वेळा उशीरा आलात तर माफी, ३ ऱ्यांदा थेट रजा वजा राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात काम करणारे ७ हजार ५०० कर्मचारी-अधिकाच्यांबरोबर राज्यातील सर्व शासकिय कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत नव्याने आदेश सरत्या वर्षाच्या शेवटी राज्य सरकारने जारी केले असून उशीराने येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वागणूकीला चाप लावण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार दोन वेळा उशीराने येणे माफ केले जाणार आहे. …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनात ९५ पेक्षा कमी प्राणवायु असेल तरच लाभ आरोग्य विभागाकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकिय पातळीवर अनेक उपाय योजना करण्यात आलेल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरीकांबरोबरच सरकारी नोकरदार बाधित झाले. तसेच या महामारीवरील उपचारासाठी खाजगी रूग्णांलयांकडून मोठ्या प्रमाणात चार्जेस आकारले जातात. त्यामुळे राज्य सरकारच्या आक्समिक आजाराच्या यादीत कोरोनाचाही समावेश केला. मात्र या आजार दरम्यान रक्तातील प्राणवायु पातळी कमी …
Read More »मंत्रालयातील अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती मिळणे होणार बंद सामान्य प्रशासन विभाग बनवतंय नवे धोरण
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनात “मलाईदार प्रतिनियुक्ती” वर असलेल्या पदांची अनेकांना भुरळ पडली आहे. त्यात महसूल विभाग अग्रेसर असला तरी इतर विभागातही त्याची थोड्या फार प्रमाणात लागण झालेली आहे. त्यामुळे विशेषत: मंत्रालयीन केडरच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या बाहेरील पदांवर प्रतिनियुक्तीवर जाणे आता बंद करण्यात येणार असून त्याविषयीचे नवे धोरण सामान्य प्रशासन …
Read More »या ७ सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनाकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या आयटी आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव चंद्रा रस्तोगी यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर डॉ.एच.मोडक यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. डॉ.संदिप राठोड यांची हाफकिन बायो-फार्मा कार्पोरेशनच्या …
Read More »आमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणून घेतल्या मागण्या
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात येण्यास राज्य सरकारने जनतेला मनाई केली. त्यामुळे एका शिक्षकाने आपल्या प्रश्नासाठी मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास प्रवेश न मिळाल्याने अखेर त्याने आकाशवाणी आमदार निवासाच्या ४ थ्या मजल्यावर सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु …
Read More »मंत्रालयात ई-फाईल, ई-लीव्ह, एमआयएस प्रणाली सुरू होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ई-ऑफिस सुरु करण्यासंदर्भात आदेश
मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय व्यवस्था गतिमान करतानाच जनतेलाही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ई-ऑफिस प्रणाली आणखी सक्षम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. त्यानुसार मंत्रालयातील नस्ती व्यवस्थापन ई-फाईल, रजा व्यवस्थापन ई-लीव्ह, ज्ञान व्यवस्थापन केएमएस, माहिती व्यवस्थापन एमआयएस या प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक मुख्यमंत्री …
Read More »या बँका देणार शासकिय अधिकाऱ्यांना वेतन खात्याबरोबर अपघात विम्याचे कवच राज्य सरकारकडे बँकांनी सादर केले प्रस्ताव
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीयकृत बँकामधील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही बँकामधील गंगाजळी कमी झाल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील चार बँकांनी आपल्या बँकातील आर्थिक व्यवहार वाढविण्याच्यादृष्टीने शासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बँकांमध्ये पगाराची खाती उघडल्यास अपघात विम्याचा मोफऱत लाभ देण्याची घोषणा केली. तसेच त्यासंदर्भातचा एक …
Read More »फडणवीस सरकारने मंजूर केलेले महसुल विभागातील कारकून बनले आता “महसूल सहाय्यक” राज्य सरकारकडून पदनाम बदलीसंदर्भात आदेश जारी
मुंबई : विशेष प्रतिनिधी सरकारमधील प्रशासनात नेहमीच महत्वाची भूमिका बजाविणारी कारकून जमात ही नेहमीच महत्वपूर्ण मानली जाते. तसेच या जमातीशिवाय दस्तुरखुद्द सरकार आणि जनतेचे पान हालत नाही. सरकारी भाषेत या कारकूनाला लिपिक हा शब्द वापरण्यात येतो. मात्र आता महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या या जमातीला कारकून अर्थात लिपिक शब्द आवडेनासा झाला …
Read More »आणि मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुन्हा करावा लागला मुक्काम कालच्या पावसामुळे सगळीकडेच पाणी
मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात ४७ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक पाऊस काल पडला. तसेच मंत्रालयातील प्रमुख तीन प्रवेशद्वारावर निसर्गाने अवकृपा दाखविल्याने अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेरच पडता आले नाही. त्यामुळे अखेर या १५ टक्के उपस्थिती राहीलेल्या बहुतांष अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्री मंत्रालयातच मुक्काम ठोकावा लागला. काही महिन्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तिन्ही मार्गावरच्या उपनगरीय रेल्वे …
Read More »
Marathi e-Batmya