Breaking News

Tag Archives: maratha reservation

जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाघ, सिंह, बकरे, कुत्रे, मांजराची गणना होते मात्र… राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात बोलताना केला सवाल

मराठी ई-बातम्या टीम या देशात वाघ, सिंह, बकरे, कुत्रे, मांजराची गणना होते. पण, माणसातील वाघांची म्हणजे ओबीसींची जातगणना केली जात नाही. शिवरायांच्या सैन्यात सर्वाधिक ओबीसीच होते. पण, हा लढणारा ओबीसी आता शांत आहे. त्यामुळेच ‘त्या’ लोकांना असे वाटते की या ओबीसींनाच जात नकोय, पण, आता शांतपणे पाहण्याची वेळ गेली आहे. …

Read More »

भाजपाने आरक्षणाचा खेळखंडोबा मांडलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

जालना: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नेहमी राहिली आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी लोकसंख्येला धक्का बसला आहे. इम्पिरियल डाटा देण्यास केंद्राने नकार दिला. मात्र असे असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे ओबीसींच्या जागा सुरक्षित झाल्या हे आपल्या सरकारचे श्रेय आहे हेही आवर्जून सांगतानाच ओबीसी …

Read More »

तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल…संभाजी बिग्रेडचा प्रस्ताव आल्यावर निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे (देहू) : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा अध्यादेश न्यायालयात टिकावा अशी आपली इच्छा आहे. पण हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. राज्यातील ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण टिकविण्याचा …

Read More »

संभाजीराजेंचा गौप्यस्फोट, “अरे कुठली खासदारकी दिली सोडून, म्हणून बाहेर पडणार होतो” पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणून देवू नका

नांदेड: प्रतिनिधी मराठा समाजाने आपल्या आरक्षण मागणीसाठी भरपूर आंदोलने केली. पण त्यात दिलेल्या शब्दांना सरकार फिरले. राज्यसभेत मला समाजाविषयी बोलण्याची संधी मागितल्यावर सुध्दा दिली नाही म्हणून मी खासदारकी सोडायची तयारी केली. पण आपल्या राज्यातल्या खासदारांमुळे मला त्यावेळेस बोलण्याची संधी मिळाल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे राज्यसभेतील खासदार तथा मराठा समाजाचे नेते संभाजीराजे यांनी …

Read More »

भाजपा राष्ट्रवादीची करणार पोलखोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देण्यासाठी केलेल्या घटनादुरुस्तीबाबत चुकीची माहिती दिली आहे. या घटनादुरुस्तीबाबत अपप्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जेथे जेथे सभा घेईल तेथे तेथे लगेचच भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि जनतेला सत्य सांगण्यासाठी पोलखोल …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, अशोकराव द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा अशोक चव्हाणांना भाजपाचे थेट मराठा आरक्षणावरून थेट आव्हान

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात कमकुवतपणे बाजू मांडून गमावल्यानंतर या सरकारचे मंत्री अशोक चव्हाण सातत्याने मराठा आरक्षणाबाबत नवे मुद्दे काढून दिशाभूल करत आहेत. आता घटनादुरुस्तीनंतर राज्याला पूर्ण अधिकार मिळाल्यानंतर ते पन्नास टक्क्यांच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत. राज्याच्या अधिकारातील कामे पूर्ण करण्याच्या ऐवजी …

Read More »

मराठा आरक्षण सुकर करण्याची संधी केंद्राने गमावली भाजपच्या मराठा खासदारांचे लोकसभेतील मौन दुर्दैवी!- अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी राज्यांच्या अधिकारांबाबत घटना दुरुस्ती करताना ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची मोठी संधी केंद्र सरकारकडे होती. परंतु, केंद्राने ही संधी गमावल्याची खंत सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. लोकसभेत मंजूर झालेल्या १२७ …

Read More »

ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा द्या; ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची लोकसभेत जोरदार मागणी

नवी दिल्ली: प्रतिनिधी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र सरकारने न्यायालयात सादर करण्यासाठी इम्पिरिकल डेटा द्यावा आणि केंद्र सरकारने नव्याने आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देणारे विधेयक आणले तरी ५० टक्के आरक्षणाच्या अटीमुळे हा अधिकार देवूनही मागास समाजांना आरक्षण देता येणार नसल्याने ही अट काढून टाकावी अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …

Read More »

अशोक चव्हाण यांनी दिले देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान ईडब्ल्यूएस'साठी घटनात्मक तरतूद शक्य तर मराठा आरक्षणासाठी का नाही?

मुंबई: प्रतिनिधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी किमान आता तरी मराठा समाजाची दिशाभूल करू नये. भाजपच्या केंद्र सरकारने संसदेत घटनात्मक तरतूद करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासून संरक्षण दिले. मराठा आरक्षणासाठी तसेच संरक्षण का शक्य नाही? असा सवाल मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण …

Read More »

गाठीभेटीनंतर आता मराठा आरक्षणासाठी चव्हाणांचे सर्वपक्षिय खासदारांना पत्र आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी जोरदार मोहीम

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेत अशोक चव्हाण यांनी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्याबाबतचा ठराव संसदेत मांडावा यासाठी आग्रह धरला. त्यानंतर राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून …

Read More »