Tag Archives: mns

राष्ट्रवादी म्हणते, राज ठाकरेंची उंची शरद पवारांच्या नखाऐवढी… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला

औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे कोणाला लक्ष्य करणार काय बोलणार याबाबतची उस्तुकता राजकिय वर्तुळात निर्माण झाली होती. मात्र राज ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर एका चकार शब्दाने न बोलता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाराष्ट्रातील जाती-पातींमध्ये द्वेषाचे राजकारण सुरु केल्याचा आरोप …

Read More »

राज ठाकरेंच्या भाषणावर जलील म्हणाले, “सियासत की दुकानों मे रोशनी के लिए…” सभेनंतर एमआयएमचे खासदार जलील यांची टीका

मुंबई, ठाणेनंतर औरंगाबादेतील सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भोंग्यावरून अल्टीमेटम दिला. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणावरून खोचक टीका केली. ते म्हणाले की, सियासत की दुकानों मे …

Read More »

संजय राऊतांचा इशारा, दोन घाव बसले की पाणी मागणार नाही… मनसे भाजपाला दिला इशारा

आतापर्यंत आम्ही आमच्याकडे सत्ता असल्यानं आणि आमचं सरकार असल्यानं संयम बाळगला, पण पाणी डोक्यावरून जात आहे. त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावे लागेल, मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील. आम्हाला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज नाही. आम्हाला लढण्यासाठी भाडोत्री लोक देखील लागत नाही. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढत नाही. आमची हत्यारे आमचीच …

Read More »

राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका दाखल करणाऱ्यास एक लाखाचा दंड औरंगाबाद उच्च न्यायालयाने याचिका लावली फेटाळून

हनुमान जयंती दिवशी पुण्यात हनुमान मंदिरात जावून महाआरती केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत जाहिर सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विविध राजकिय पक्षांकडून सामाजिक संघटनांकडून राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करत सभेला परवानगी देवू नका अशी मागणी केली. राज ठाकरे यांच्या सभेला दिलेली परवानगी रद्द करावी …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, त्यांचे बंधु मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते… गुजरातचे कौतुक केले आता उत्तर प्रदेशचे करतायत

जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचं नाही असं ठरवलं असेल तर मग दुसर्‍या राज्याचे कौतुक ते करणारच असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. राज ठाकरे यांनी युपीचे कौतुक केले आहे असा प्रश्न …

Read More »

कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… महागाईचे चटके कमी होणार का? गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपरोधिक टोला

कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय… सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स महागाईवर कसं बोलू नये यासाठी हे सर्व केलं जातंय व त्या ट्रॅपमध्ये तुम्ही …

Read More »

अजित पवारांचा खोचक सवाल, अयोध्येला जाण्याचा बोभाटा का, आम्ही गेलो… राज ठाकरेंना लगावला टोला

पुण्यात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर उलट-सुलट तर्क-वितर्क लढविले जात असताना यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत खोचक सवाल केला. अहो भारतात कोणी कुठेही जावू शकतो. त्यामुळे ज्याला अयोध्येला जायचं आहे त्याला …

Read More »

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, हनुमानाच्या शेपटीपेक्षा अधिक वाढणाऱ्या महागाईवर बोला मनसेप्रमुख राज ठाकरेंना टोला

सध्या देशात हनुमानाच्या शेपटीपेक्षा अधिक गतीने महागाई वाढत आहे. मात्र राज ठाकरे तुम्ही फक्त हनुमान चालिसावर बोलत आहात. कधी तरी त्या हनुमान शेपटासारख्या महागाईवरही बोला असा उपरोधिक टोला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला. आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ही रोज सकाळी हनुमान चालिसा …

Read More »

गोबेल्स नीतीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायचीय देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जातय त्यामुळे तरुणांमध्ये अस्थिरता-जयंत पाटील

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे. त्यांना फुले – शाहू – आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाई येथे केले. सध्या देशात गोबेल्स नीती अवलंबिली जात …

Read More »

संजय राऊतांच्या वक्तव्यावर राज म्हणाले, मी लवंड्यावर… पुण्यातील पत्रकार परिषदेत दिले उत्तर

मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसेला उपरोधिक टोला लगावत भाजपा आपले काम नव एमआयएम आणि नवं हिंदूत्वावादी ओवेसीच्या माध्यमातून करून घेत असून या निमित्ताने महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात सध्या पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे …

Read More »