नव्याने राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणीस सरकारचे पावसाळी अधिवेशन पहिलेच असूनही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी चांगलेच घेरले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगतदार झाल्याचे दिसून येत आहे. मात्र विरोधकांच्या सततच्या प्रश्नाच्या भडीमारामुळे थोडेसे गांगरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थेट विधानसभेत विरोधकांना सूचक इशारा देत म्हणाले, मी तुमच्यासोबतही काम केले आहे. त्यामुळे …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मुंडेवर पलटवार, तुमचा प्रवास माहित आहे ना…. विरोधकांनाही दिले सडेतोड उत्तर
नगर परिषदेच्या नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारीत विधेयक विधानसभेत सादर केले. या विधेयकावर बोलताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. तसेच राष्ट्रवादीचे आमदार धंनजय मुंडे यांनीही खोचक शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »एकनाथ खडसे यांची मागणी, बेरोजगारांना ५ हजार बेरोजगारी भत्ता सुरु करा तारांकित प्रश्नातून राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला घेरले...
राज्यातील सेवायोजन कार्यालय (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) जवळपास बंद झालेले आहेत. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून पूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या त्या आता होत नाहीत. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी बेरोजगारी भत्ता मिळत होता. राज्य सरकारने तो भत्ता बंद केलेला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना महिना ५ हजार रुपये भत्ता द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आणि …
Read More »धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला, ‘एकनाथ’च रहावे ‘ऐकनाथ’ होऊ नये थेट निवडणूकीतून नगराध्यक्ष निवडीवरून साधला निशाणा
विधानसभेतील पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगलं असून आज नगर परिषद अध्यक्ष जनतेतून निवडून दिले जावेत, यासंबंधीच्या विधेयकवरून माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतो, हे दुर्दैव …
Read More »जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, कमी कालावधीत मत परिवर्तन कसे होऊ शकते? थेट नगराध्यक्ष निवडीवर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर जयंत पाटील यांचा आक्षेप...
एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते ? असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच हे विधेयक अस्तित्वात येणे कसे चूक आहे यासाठी वकिली केली होती. त्यावेळी त्यांचा उत्साह इतका होता की …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा सवाल, हायवे समस्यांवर काही ठोस धोरण आहे का ? खराब महामार्गामुळे नाशिक-मुंबईसाठी ३ तासाऐवजी ६ तास लागतात
महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे …
Read More »छगन भुजबळ यांचा सवाल, नर डास जास्त संहारक की मादी डास विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ?
विधानसभेच्या सकाळच्या विशेष सत्रात मागील आठवड्यात अजित पवार यांच्यासह विरोधकांच्या हत्तीपाय रोगावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यावरून आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांची चांगलीच फजिती झाली. त्यामुळे तो प्रश्न राखीव ठेवण्यात आला होता. त्या राखीव ठेवण्यात आलेल्या प्रश्नाला आज आरोग्य मंत्री सावंत यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळीही सावंत यांनी अजबच …
Read More »आणि मुख्यमंत्री शिंदेच्या मदतीला विधानसभाध्यक्ष धावले राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्ल्यात सापडण्यापासून थोडक्यात बचावले
विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्ष थेट निवडणूकीच्या माध्यमातून निवडूण आणण्याविषयीचे सुधारीत विधेयक आज मांडले. मात्र त्यांच्या या विधेयक मांडण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सतर्कता दाखविल्याने मुख्यमंत्र्यांची कोंडीत सापडण्याऐवजी सुटका …
Read More »छगन भुजबळ म्हणाले, सध्या दोनच दाढी एक पांढरी दाढी अन् काळी दाढी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढला चिमटा
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आज दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने मंजूर केलेले जीएसटी विधेयक विधानसभेतही मंजूर करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी विधेयक मांडले. त्यावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून चिमटा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली. सत्ताधारी …
Read More »पावसाळी अधिवेशन: गद्दारांना ताट – वाटी… चलो गुवाहाटी ईडी सरकार हाय हाय.. फसवी मदत जाहीर करणार्या सरकारचा धिक्कार असो...
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. विधानसभेच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… ईडी सरकार हाय …
Read More »
Marathi e-Batmya